सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
भद्रावती : स्वर्गीय खासदार यांच्या वरोरा-भद्रावती मतदार संघात काँग्रेसला तडा गेल्याचे वृत्त समोर आले आहे.आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तालुक्यातील कुचना येथील तालुका महिला काँग्रेस च्या माजी अध्यक्षा वर्षा ठाकरे ह्यांनी आज 18 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेडीसन ब्लू हॉटेल येथे शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल हाती घेतली.
याप्रसंगी शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख रविद्र शिंदे, चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी संपर्क प्रमुख सुषमा साबळे, जेष्ठ शिवसैनिक जयदीप पेंडसे, पुर्व विदर्भ युवासेना सचिव तथा सिनेट सदस्य निलेश बेलखेडे आणि भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल हे प्रामुख्याने उपस्थित होते.
वर्षा राजेश ठाकरे ह्यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दित कुचना ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच व सदस्य पद भूषविले. त्या कुचना ग्राम.पं. च्या विद्यमान सदस्या तसेच भद्रावती नागरी पतसंस्थेच्या संचालिका आहे. त्याच सोबत त्यांचा विविध संघटनांत सक्रिय सहभाग सुद्धा आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपुर जिल्हा महीला आघाडी व वरोरा-भद्रावती विधानसभा महीला आघाडीच्या वतीने त्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.मात्र या प्रवेशाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला आगामी काळात मोठा धक्का बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आता रंगत आहे.
काँग्रेस च्या तालुका महिला माजी अध्यक्ष वर्षा ठाकरेंचा काँग्रेस ला रामराम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 18, 2024
Rating: