सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : दिनांक 15/08/2024 रोजी स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त माननीय TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण TDRF चे मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान ज. सय्यद यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणा नंतर TDRF च्या स्पेशल सम्मान गार्डस व उपस्थित सर्व TDRF अधिकारी जवानांकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना सलामी देऊन राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीतानंतर महाराष्ट्र राज्य गीत गायले. त्यांनतर भारत भूमि की जय , वंदे मातरम् , जय भारत च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. ध्वजारोहणानंतर TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या कडून व TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान जलील सय्यद यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे व जवानांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली व देशातील व शेतकरी (अन्नदात्याचे) आभार व्यक्त केले. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन कार्य करणाऱ्या अधिकृत नोंदणीकृत जवान वर्गीकरण यांच्या वतीने शासकीय कार्यक्रम आहे. लेखी स्वरूपात कळवल्यावरून वणी तहसील मध्ये उपस्थित होऊन दरवषी प्रमाणे याही वर्षी वणी तालुक्यांतील TDRF अधिकारी व जवान TDRF राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली मा. उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
TDRF ट्रूप कमांडर साहिल लोखंडे TDRF चे वणी कंपनी कमांडर गणेश बुरांडे गणेश सोनटक्के, प्रेम उइके, लकी प्रजापती, शंकर बावणे, दुर्गा डाखरे, खुशी ताजने, प्राची आसुटकर, सेजल भुसे, श्वेता आसुटकर, आचल आस्वले, पौर्णिमा नागोसे, वैष्णवी नागपूरे, अनुश्री येटे, वास्ती कुळमेथे, ऋषाली वाटेकर, प्रेम सातपुते, आकाश पोयाम आस्था मोगरे ईशा जूनघरी श्रुती बोंडे व संतोष टेंमुर्डे, सुनील मुजगेवार, अश्विनी रामगिरवार, दामिनी बल्कि, संगीता टेंमुर्डे, अर्चना मुजगेवार ई. उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनी TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालयात ध्वजारोहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 18, 2024
Rating: