निष्पाप 35 वर्षीय महिलेची अत्याचार करुन हत्या, एका संशयित नराधमला अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राळेगाव : राज्यातील महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस जिल्हा असो की,तालुक्यातील महिलेवर अत्याचार सारख्या घटना समोर येत आहे. अशीच ऐक राळेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोनुर्ली रोडवर कचरा डपींगच्या परीसरात एका तरुण आदिवासी माहिलेचा मृतदेह काल संशयांस्पद निर्जनस्थळी आढळून आल्याची घटना समोर आली, या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. 

आरती शरद कोवे (35) रा. पिंप्री (दुर्ग) असे निष्पाप मृतक महीलेचे नाव आहे. ती शुक्रवारी 16 ऑगस्ट 2914 रोजी दुपारच्या सुमारास राळेगाव येथे बाजारात जाते म्हणून घरुन गेली होती. परंतु ती घरी पोहचली नसून तीचा मृतदेहच एका निर्जनस्थळी संशयांस्पद स्थितीत आढळून आल्याने यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

सदर आरोपीने स्वतःचे कुकर्म लपण्यासाठी महिलेचा बळी घेतल्याचे बोलल्या जात असून याप्रकरणी विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आरोपीला कठोर शासन झाले नाही तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे बिरसा ब्रिगेड चे अरविंद कुळमेथे यांनी सोशल माध्यमातून ठणकावून सांगितले.

अटकेंनंतर आरोपीने खळबळजनक आरोप करून मृतक महिलेला बदनाम करण्याचा घाट घातल्याचा प्रकार असल्याचे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नराधम हा मृतक महिलेला वेळोवेळी शरीर सुखाची मागणी करीत असंल्याची चर्चा असून सदर आरोपी हा अविवाहित असल्याने त्याला दुसरीकडे आपला संसार थाटायचा होता, मात्र इकडे जुगाड अडचण ठरत असल्याने आरोपीनी आरतीला आपल्या मार्गांवरून हटवले व तीची हत्या केली असा आदिवासी समाज बांधवातून आरोप व्यक्त होत आहे. 

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राळेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांनी आरोपीला रात्रीच अवघ्या काही तासात गणेश येपारी (वय 21) रा.शांतीनगर राळेगाव नामक याला पोलिसांनी अटक केली असुन आरोपी विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राळेगाव रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासन करित आहे.
निष्पाप 35 वर्षीय महिलेची अत्याचार करुन हत्या, एका संशयित नराधमला अटक निष्पाप 35 वर्षीय महिलेची अत्याचार करुन हत्या, एका संशयित नराधमला अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on August 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.