सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : मराठी साप्ताहिक महाराष्ट्र मिडिया द्वारा आयोजित औरंगाबाद येथे "राष्ट्रीय सेवा रत्न" पुरस्काराने येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा अ. भा. सं. ह. प. च्या राज्याध्यक्ष मनिषा तिरणकर यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 17 आगस्ट 2024 ला मौलाना रिसर्च सेंटर मजनु हिल टिव्ही सेंटर रोड, येथे पार पडला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा सोहळा एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मनीषा तिरणकर ह्यांची सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान केला, या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष मा.प्रा.टि.पी मुंडे, प्रांताध्यक्ष होते. अनिल मोरे मराठी चित्रपट अभिनेते, मा.विक्रम काळे, आमदार शिक्षक मतदार संघ, औरंगाबाद यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या प्रसंगी मुख्य अतिथी मा. आ.एम.एम. शेख माजी विधानपरिषद सदस्य, विशेष अतिथी मा.हर्षल जरोदे,ओनर ओलिंडा पेन्टस प्रा.लिमिटेड नाशिक, प्रमुख पाहुणे मा.संगीता जामगे, जेष्ठ साहित्यिक पुणे, मा.शोभा बिहाडे, चित्रपट निर्माती, बेटा प्रदेश में मा.ज्योती सदाशिव, बिझनेस क्वार्डिनेटर, बुलढाणा,मा.अनिल नरेडी, सहनिर्माते, संविधान एक रास्ता, मा.प्रा.अशोक जोंधळे, संगीतकार परभणी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अजमत खान, रमाकांत कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार, अध्यक्ष पुरस्कार निवड समिती, बालासाहेब फड, निंमत्रक, सोमेश्वर साथी हे होते.
मनिषा तिरणकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2024
Rating: