सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : पडोली फाटा चौक येथे नेहमीच जड वाहतुकीची वर्दळ असतात. अशातच या राज्य महामार्गावर खड्डे पडल्याने काल एका मुलीची गाडी ट्रक खाली येऊन तिचा पाय गंभीरित्या जखमी झाला. या अपघाताचे कारण श्री.अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांना कळताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईल द्वारे संपर्क साधून तत्काळ या परिसरातील राज्य महामार्गावरचे खड्डे बुजविण्यात यावे असे सांगण्यात आले.
आज बुधवार (ता.१६) ला लगेच खड्डे बुजवण्याकरिता आलेल्या टीमला रस्त्यावरील ठिकठिकाणीचे खड्डे दाखवून त्वरित खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली तसेच यानंतर या रोडवर कुठल्याही प्रकारे खड्डे दिसता नये, असे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून ताकीद देण्यात आली.
या महामार्गांवरील "रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते" असे बोलले जात असताना श्री. डोंगरे यांनी कामाप्रती दाखवलेल्या तप्तरतेचे प्रवाशा सह स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
पडोली फाटा राज्य महामार्गावरील खड्डे बुजावण्यास सुरुवात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 18, 2024
Rating: