सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते पंढरपूरात चंद्रभागा स्वच्छता अभियानात सहभागी होतात, मारेगाव तालुक्यातील कानडा येथून "स्वच्छता दिंडी" सरपंच सौ सुषमा रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात पंढरपूरला आज (ता.१७) रवाना झाली आहे.
विठ्ठलाच्या नामस्मरणात, गुरूदेवाच्या गजरात कानडा येथून स्वच्छता दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान कानडा येथील सरपंच सौ. सुषमा ढोके सह रूपेश ढोके, सुरज येवले, पंढरी येवले, हरिश्चंद्र डाहूले, दिवाकर गाडगे, रामदास ढेंगळे सह कानडा व हिवरा येथील ५० गुरूदेव उपासक स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होणार आहे.
दिंडीचे हे १० वे वर्ष आहे. स्वच्छता दिंडीचे पूजन करून नारड फोडण्यात आली. या अभियानात सहभागी होणाऱ्या स्वच्छतादुतांना गावाकऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. यावेळी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सेवकराम दादा मिलमीले यांच्या मार्गदर्शनात हा 'चंद्रभागा स्वच्छता अभियान' दरवर्षी उपक्रम चालतो,असे गुरुदेव उपासक रुपेशभाऊ ढोके यांनी सांगितले.
सरपंच सौ. सुषमा रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात कानडा येथून स्वच्छता दिंडी पंढरपूरला रवाना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 17, 2024
Rating: