मारेगाव बसस्थानक बांधकाम करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची आमदार बोदकुरवार यांनी घेतली दखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वर्षानुवर्ष स्थगित आणि प्रलंबित असलेल्या मारेगाव बसस्थानक बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संघटनेचे जेष्ठ नेते देवराव वाटगुरे शामादादा कोलाम ब्रिगेड चे पांडुरंग टेकाम यानी 16 जुलै पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. 

सदर उपोषणाला भाजपा तालुकध्यक्ष अविनाश लांबट व शिष्टंमंडळ सहित भेट दिली असता त्यांनी लवकरच आमदार साहेब यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल असे, आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी स्वतः भाजपा तालुकध्यक्ष अविनाश लांबट हे स्वतः आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना घेऊन उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी घेऊन आले. त्यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याशी चर्चा करून बसस्थानक बांधकाम तत्काळ सुरू कण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा अशी मागणी केली. त्यावर आमदार यानी बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता श्री ओचावार यांना स्वतः मारेगाव येथील राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव 30/11/2023 रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये बसस्थानक बांधकाम करण्यासाठी मान्यता देऊन 249,68 लक्ष मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपोषण कर्त्याना दिली. 
त्यावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या समोर मारेगाव बसस्थानक बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी व निधी वितरण आदेशासह स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा यवतमाळ यांचा धनादेश क्रमांक 225097 दिनांक 14/2/2024 रुपये 49,93,000 निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असताना कामाची सुरवात का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारला असता निविदा नुसार 15 ऑगस्ट 2024 रोजी व त्या पूर्वीच टेंडर ओपन करूनवर्क ऑर्डर घेऊन प्रत्यक्ष कामाची सूरवात होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. ओचावार यानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या समोर आश्वासन दिले. 

त्यावर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त देवराव वाटगुरे यांनी आमदार यांच्या कडून डाळिंबाचा रस पिऊन उपोषण स्थगित करण्यात आले. विद्यमान आमदारांनी दिलेला शब्द व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन याची पूर्तता होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मारेगाव बसस्थानक बांधकाम करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची आमदार बोदकुरवार यांनी घेतली दखल मारेगाव बसस्थानक बांधकाम करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची आमदार बोदकुरवार यांनी घेतली दखल Reviewed by सह्याद्री चौफेर on July 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.