रेती तस्करांवर भरदिवसा कारवाईची मात्रा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

 वणी : अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने छापा टाकत एक हायवा वाहनावर जप्तीची कारवाई आज भरदुपारी केली. त्यामध्ये तब्बल सात ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे उघड झाले.

वणी तालुक्यात रेती तस्करांचे मनसुबे फोफावले असतांना येथील महसूल विभाग हे स्वतः ऍक्शन मोडवर येत पथक कार्यान्वित केले. यात मागील काही दिवसापासून अनेक वाहनावर धडक कारवाई करून तस्करांचे मनसुबे हाणून पाडले. त्यामुळे कमालीचे तस्करांचे धाबे दनाणले आहे. 

दरम्यान, सातत्याने अवैध रेती तस्करावर केल्या गेलेल्या कारवाईनंतरही रेती तस्करांच्या मुजोऱ्या कायम असतांना आज बुधवारला भरदुपारी गोपनीय माहिती च्या आधारे महसूल पथक वणी-वरोरा बायपास वरील संविधान चौकात धडकत रेतीचा ट्रक नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, मत्ते, ग्राम.वि. अधिकारी सुनील उराडे व महसूल सहाय्यक अशोक चौधरी, शिपाई गणेश राजूरकर, वाहन चालक मनीष धुर्वे यांचेसह महसूल पथकाने पकडला.

महसूल पथकाने त्वरित कारवाई करत हायवा ट्रक क्रमांक (MH- 34 BG- 4047) ताब्यात घेतला. जप्त केलेला ट्रक हा वणी एसटी डेपो आवारात उभा करण्यात आला आहे. पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया महसूल विभागाच्या वतीने सुरू आहे.

शि. प्र. मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही सुयश प्राप्त केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 96.80 टक्के लागला तर, कला शाखेचा निकाल 73.45 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेतुन प्रथम मनिष किशोर निंबाळकर (83.83), व्दितिय कु. आचल रितेश गोजे (82.50), तृतीय नहर सुधाकर विडुळकर (72) आले.

तर कला शाखेतुन प्रथम कु. अनुष्का राजेश बावणे (71.50), व्दितीय कु. भुमी अशोक बोरकर (70), तृतीय कु. आचल दत्तात्रय राजुरकर (68.83) आले.
उत्तीर्ण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री. विजयभाउ मुकेवार, उपाध्यक्ष श्री नरेंद्र बरडिया, सचिव श्री. सुभाषराव देशमुख, सहसचिव श्री. अशोक सोनटक्के तसेच सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य प्र. वा. क्षिरसागर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

वणीत खादी कॉटन महोत्सव सेल; लग्नसराई ऑफरला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : ‘खादी कॉटन महोत्सव सेल’ चे आयोजन जैताई मंदिर वणी येथे करण्यात आले आहे. या महोत्सव सेल मध्ये नवीन स्टॉक व उत्तम क्वालिटी असून अनेक मोठ्या व्यापाऱ्यांकडून आणि घाऊक विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. 
या खादी कॉटन महोत्सव सेल मधील खादी कपडे आणि इतर व्हेरायटी आणि वैशिष्ट्य याबद्दल खात्री झाल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे. 
या सेल ला आता केवळ काही दिवस शिल्लक असून या कालावधीत नागरिकांनी आणखी जास्त प्रतिसाद द्यावा व भारतीय उद्योगाला चालना मिळण्यासाठी मदत करावी, असे आवाहन खादी कॉटन महोत्सव सेल चे मुख्य कार्यकारी सतीश पाटील यांनी केले आहे.


उठा सज्ज व्हा! उद्या ७ मे रोजी देशभरात वॉर मॉकड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. देश कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.

७ मे २०२५ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात एक मोठी वॉर मॉकड्रिल होणार आहे.या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे सामान्य नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत विशेषतः हवाई हल्ल्यांच्या वेळी काय करावे याचे प्रशिक्षण मिळावे.

या प्रसंगी सामान्य नागरिकांनी ही १० महत्त्वाची पावलं उचलणे गरजेचे आहे.

१) सायरनचा आवाज शांतपणे ऐका
सायरन वाजवला गेल्यावर घाबरू नका. हा फक्त एक सराव आहे. शांत रहा आणि गोंधळ घालू नका.

२) ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा
बाहेर असाल तर जवळच्या इमारतीत, घरी किंवा बंकरमध्ये जा. ५-१० मिनिटांत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा.

३) ब्लॅकआऊटमध्ये सहकार्य करा
घरातील लाईट्स बंद करा. खिडक्या, दरवाजे काळ्या कपड्यांनी झाका. वाहन रस्त्याच्या बाजूला उभं करा व लाईट बंद करा.

४) प्रशिक्षणात भाग घ्या
ड्रिलदरम्यान सिविल डिफेन्सचे प्रशिक्षण दिले जाईल. स्वतःहून सहभागी व्हा. काय करायचं, कुठे जावं याचा सराव करा.

५) सुरक्षित मार्ग आणि आश्रयस्थानाची माहिती ठेवा
आपल्या भागातील बंकर, हॉस्पिटल, सुरक्षित जागा ओळखा आणि कुटुंबासोबत आधीच चर्चा करा.

६) सरकारी अलर्टवर लक्ष ठेवा
टीव्ही, रेडिओ, मोबाईलवर सरकारी सूचना ऐका. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीच ऐका.

७) आपत्कालीन किट तयार ठेवा
पाणी, अन्न, औषधे, टॉर्च, बॅटरी, ओळखीची कागदपत्रं, चादर, कपडे यांसह एक किट तयार ठेवा.

८) प्रशासनाला सहकार्य करा
पोलिस, सिविल डिफेन्स, होम गार्ड यांना मदत करा. काही माहिती हवी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा.

९) कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगा
लहान मुलांना, वृद्धांना ही प्रक्रिया काय आहे हे समजावून सांगा. त्यांची काळजी घ्या, मदतीसाठी तयार रहा.

१०सोशल मिडियावरील अफवांपासून सावध रहा
फेक मेसेज फॉरवर्ड करू नका. अफवांवर विश्वास न ठेवता सरकारकडून दिलेल्या माहितीलाच मान्यता द्या.


वेल्डिंग व्यावसायिकाला मारहाण करून केले जखमी

सह्याद्री चौफेर |ऑनलाईन

वणी : श्री विनायक मंगल कार्यालय समोर एका वेल्डिंग व्यावसायिकाला भरदुपारी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. पत्नी सह लग्न कार्याला जात असताना लग्नाची वरात रस्त्यावर असल्याने गाडी समोर घेता येत नसल्याने ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेपेरा रोड वर सुरेश भुवाजी आसूटकर (वय 57) रा.वणी यांचे वेल्डिंगचे दुकान आहे. दि.5 मे रोजी ते गाडीने पत्नीसह मुकुटबन रोड वरील श्री. विनायक मंगल कार्यालयात लग्नासाठी जात होते. मंगल कार्यालयासमोर वरात आणि बँड रस्त्यावर असल्याने गाडी समोर घेता येत नव्हती, आरोपी शंकर श्रावण थेरे (36) रा. गणेशपूर, ता वणी याने दगड मारून जखमी केले व शिवागीळ करून थापडबुक्क्यानी मारहाण करून मारण्याची धमकी दिली. तसेच वाहन क्र. (एम एच 29,सी जे 0497) ची त्याने काच फोडून अंदाजे किंमत 30000/- रुपये चे नुकसान केले. ही घटना दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. 
या घटनेची सुरेश आसटकर यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारी व मेडिकल रिपोर्ट वरून पोलिसांनी बि एन एस नुसार कलम 125(a), 324(4),352,351(2) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेका संतोष आढाव करत आहे.