शि. प्र. मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही सुयश प्राप्त केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 96.80 टक्के लागला तर, कला शाखेचा निकाल 73.45 टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेतुन प्रथम मनिष किशोर निंबाळकर (83.83), व्दितिय कु. आचल रितेश गोजे (82.50), तृतीय नहर सुधाकर विडुळकर (72) आले.

तर कला शाखेतुन प्रथम कु. अनुष्का राजेश बावणे (71.50), व्दितीय कु. भुमी अशोक बोरकर (70), तृतीय कु. आचल दत्तात्रय राजुरकर (68.83) आले.
उत्तीर्ण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री. विजयभाउ मुकेवार, उपाध्यक्ष श्री नरेंद्र बरडिया, सचिव श्री. सुभाषराव देशमुख, सहसचिव श्री. अशोक सोनटक्के तसेच सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य प्र. वा. क्षिरसागर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शि. प्र. मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा शि. प्र. मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा Reviewed by सह्याद्री चौफेर on May 07, 2025 Rating: 5
Powered by Blogger.