रेती तस्करांवर भरदिवसा कारवाईची मात्रा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

 वणी : अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाने छापा टाकत एक हायवा वाहनावर जप्तीची कारवाई आज भरदुपारी केली. त्यामध्ये तब्बल सात ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे उघड झाले.

वणी तालुक्यात रेती तस्करांचे मनसुबे फोफावले असतांना येथील महसूल विभाग हे स्वतः ऍक्शन मोडवर येत पथक कार्यान्वित केले. यात मागील काही दिवसापासून अनेक वाहनावर धडक कारवाई करून तस्करांचे मनसुबे हाणून पाडले. त्यामुळे कमालीचे तस्करांचे धाबे दनाणले आहे. 

दरम्यान, सातत्याने अवैध रेती तस्करावर केल्या गेलेल्या कारवाईनंतरही रेती तस्करांच्या मुजोऱ्या कायम असतांना आज बुधवारला भरदुपारी गोपनीय माहिती च्या आधारे महसूल पथक वणी-वरोरा बायपास वरील संविधान चौकात धडकत रेतीचा ट्रक नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, मत्ते, ग्राम.वि. अधिकारी सुनील उराडे व महसूल सहाय्यक अशोक चौधरी, शिपाई गणेश राजूरकर, वाहन चालक मनीष धुर्वे यांचेसह महसूल पथकाने पकडला.

महसूल पथकाने त्वरित कारवाई करत हायवा ट्रक क्रमांक (MH- 34 BG- 4047) ताब्यात घेतला. जप्त केलेला ट्रक हा वणी एसटी डेपो आवारात उभा करण्यात आला आहे. पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया महसूल विभागाच्या वतीने सुरू आहे.
रेती तस्करांवर भरदिवसा कारवाईची मात्रा... रेती तस्करांवर भरदिवसा कारवाईची मात्रा... Reviewed by सह्याद्री चौफेर on May 07, 2025 Rating: 5
Powered by Blogger.