सराटी येथे सामाजिक सभागृहचा लोकार्पण सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सराटी येथे उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा दि. 7 मे 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. 

आदिवासी नेते तथा सरपंच तुळशीराम कुमरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे गणपतराव आत्राम, ग्राम.सदस्य विष्णूजी कांबळे, यांची उपस्थिती होती.  

या भव्य सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सराटीत एक वेगळाच उत्साह संचारला होता. तेथील स्त्री-पुरुष नागरिकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. सामाजिक सभागृहाच्या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यानिमित्ताने सभागृहाला जागा दान कर्ते घनश्याम पाटील व दिलीप पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ग्राम अधिकारी जनबंधू यांनी तर आभार प्रदर्शन लीलाधर ठेंगळे यांनी मानले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गोपाल वनकर, रमेश गौरकार, प्रवीण वानखेडे, सीमा नरांजे, विमलबाई वानखेडे, बिरजू भरणे, सुशिलाबई नरांजे, संघर्ष तेलंग, सुर्यभान वानखेडे, लोकेश कांबळे, शारदा बोरकर, मिथुन वानखेडे, अमोल वानखेडे, रत्नमाला वनकर, भास्कर सपाट ई. समाजबांधवांनी सहकार्य केले.