सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील वार्ड नं. 16 मधील एका तरुणीने बेडरूम मध्ये आत्महत्या केली आहे. ही दुःखद घटना आज सकाळी उघडकीस आली.
दिक्षा केशव उमरे (अंदाजे वय 26) असं या तरुणीचे नाव आहे, सकाळी घरचे लोकं उठल्यानंतर बेडरूम मध्ये जावून बघण्यासाठी गेले असता दार बंद होते. या दरम्यान बेडरूमचा लॉक तोडल्यावर आतील सलिंगच्या पंख्याला ओढणीने लटकून असल्याचे त्यांना तरुणी दिसली. या धक्कादायक प्रकाराने उमरे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. दिक्षा हिच्या आत्महत्येचे कारण तूर्तास अस्पष्ट असून मारेगावात हळहळ व्यक्त होत आहे. ती उच्चशिक्षित असून औरंगाबाद येथे जॉब करत असल्याचे समजते.
तिच्या पाठीमागे आई वडील,व एक लहान बहीण असा परिवार आहे.
पंख्याला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 08, 2025
Rating: