टॉप बातम्या

उठा सज्ज व्हा! उद्या ७ मे रोजी देशभरात वॉर मॉकड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. देश कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.

७ मे २०२५ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात एक मोठी वॉर मॉकड्रिल होणार आहे.या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे सामान्य नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत विशेषतः हवाई हल्ल्यांच्या वेळी काय करावे याचे प्रशिक्षण मिळावे.

या प्रसंगी सामान्य नागरिकांनी ही १० महत्त्वाची पावलं उचलणे गरजेचे आहे.

१) सायरनचा आवाज शांतपणे ऐका
सायरन वाजवला गेल्यावर घाबरू नका. हा फक्त एक सराव आहे. शांत रहा आणि गोंधळ घालू नका.

२) ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा
बाहेर असाल तर जवळच्या इमारतीत, घरी किंवा बंकरमध्ये जा. ५-१० मिनिटांत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा.

३) ब्लॅकआऊटमध्ये सहकार्य करा
घरातील लाईट्स बंद करा. खिडक्या, दरवाजे काळ्या कपड्यांनी झाका. वाहन रस्त्याच्या बाजूला उभं करा व लाईट बंद करा.

४) प्रशिक्षणात भाग घ्या
ड्रिलदरम्यान सिविल डिफेन्सचे प्रशिक्षण दिले जाईल. स्वतःहून सहभागी व्हा. काय करायचं, कुठे जावं याचा सराव करा.

५) सुरक्षित मार्ग आणि आश्रयस्थानाची माहिती ठेवा
आपल्या भागातील बंकर, हॉस्पिटल, सुरक्षित जागा ओळखा आणि कुटुंबासोबत आधीच चर्चा करा.

६) सरकारी अलर्टवर लक्ष ठेवा
टीव्ही, रेडिओ, मोबाईलवर सरकारी सूचना ऐका. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीच ऐका.

७) आपत्कालीन किट तयार ठेवा
पाणी, अन्न, औषधे, टॉर्च, बॅटरी, ओळखीची कागदपत्रं, चादर, कपडे यांसह एक किट तयार ठेवा.

८) प्रशासनाला सहकार्य करा
पोलिस, सिविल डिफेन्स, होम गार्ड यांना मदत करा. काही माहिती हवी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा.

९) कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगा
लहान मुलांना, वृद्धांना ही प्रक्रिया काय आहे हे समजावून सांगा. त्यांची काळजी घ्या, मदतीसाठी तयार रहा.

१०सोशल मिडियावरील अफवांपासून सावध रहा
फेक मेसेज फॉरवर्ड करू नका. अफवांवर विश्वास न ठेवता सरकारकडून दिलेल्या माहितीलाच मान्यता द्या.


Previous Post Next Post