सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे विद्यमाने दिनांक 05 एप्रिल 2025 रोज शनिवारला राजूर येथील बिरसा भूमी येथे क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्र्वर शेडमाके व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सकाळी 9 वाजता आदिवासी संस्कुती नुसार आदिवासी समाज बांधवानी निसर्ग पूजन म्हणून गोंगो पूजा व आदिवासी सप्तरंगी ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर साय. 7 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक मा. संजयभाऊ देरकर आमदार वणी विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा डॉ सुनीलकुमार जुमनाके बालरोग तज्ञ तथा संचालक सुगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वसंत जिनिंग चे अध्यक्ष मा. अशिषभाऊ खुलसंगे व प्रमुख पाहुणे म्हणून मा संघदीप भगत माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, सौ अश्र्विनीताई प्रकाश बल्की उपसरपंच ग्रामपंचायत राजूर, मा प्रनिताताई मो. असलम माजी सरपंच ग्रामपंचायत राजूर, डॉ. गोपणे, वामन पा. बल्की पोलीस पाटील राजूर, मा. विजयभाऊ पेंदोर सामाजिक कार्यकर्ता व सौ. मंजुषाताई सिडाम सदस्य ग्रामपंचायत राजूर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष मारोती आत्राम होते, प्रास्ताविक संघटनेचे मुख्यसंघटक ॲड अरविंद सिडाम यांनी केले, सूत्रसंचालन सविता येलादे यांनी केले व आभार संघटनेचे सचिव रामकृष्ण सिडाम यांनी मानले. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर आधारित एकपात्री प्रयोग मा रामचंद्र आत्राम सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा विहिरगाव यांनी उत्कृष्ट रित्या सादरीकरण केले. त्यानंतर साय. 8 वाजता गोंडी व भीम गीताचा संगीतमय कार्यक्रमाने आदिवासी गोंडी ऑर्केस्ट्रा बल्लारपूर व संच यांनी विविध गोंडी, कोलामी भाषेत व भीम गीते गाऊन प्रेक्षकांचे प्रबोधन व मनोरंजन केले.
या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, राजूर गावातील व परिसरातील लोक हजर होते. या कार्यक्रमास यशस्वी बनविण्याकरिता आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता ॲड अरविंद सिडाम, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, रोहित कीनाके, संदीप सिडाम, राजू पंधरे, कृष्णा मेश्राम, रमेश येडसकर, उज्वल कुमरे, रुपेश नैताम, सुदर्शन कुमरे, रजत आत्राम, शिरेष कुमरे, आदित्य येलादे, किसन किणाके, विजय उईके, लकी सुरपाम, सागर किनाके, जगण सुरपम, विजय गडे, चेतन केरम, गणेश कोवे, हरिदास कोडापे, अजय कदम, राजेश उईक, सहील किनाके, पियूष घोडाम, सहिल मेश्राम, सूरज पेंदाम, किसन किनाके, सानिका नैताम, श्रावणी मेश्राम, स्वेता टेकाम, गायत्री कनाके, धनश्री पंधरे, अंकीता उईके, अंजली ऊईके, निशा कुमरे, खुशी येलादे, तनु टेकाम, लकी सुरपाम, सागर किनाके, जगन सुरपाम, नागेश किनाके, चेतन केराम, नागेश कोडापे, गायत्री कनाके, लक्ष्मी कनाके, शुभांगी कनाके, सुरज आत्राम, विजय गडे व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.