टॉप बातम्या

महिलेच्या गळ्यातील 12 ग्रॅमचा सोन्याचा गोप ओढून लांबवला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : किर्तन संपले महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून श्रद्धालू महिला त्यांचे जवळ दर्शनासाठी जावून खाली वाकताच महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ कोणीतरी अज्ञाताने ओढून नेल्याची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली आहे. ही घटना श्री जगन्नाथ महाराज मंदिर, भांदेवाडा येथे रविवार दि. 6 एप्रिल रोजी घडली.
वणी तालुक्यातील भांदेवाडा येथे रविवार ला जगन्नाथ महाराज मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. शारदा गुलाबराव मेहपुरे (वय 55) रा. नेहरू वार्ड, ता. चिमूर जि. चंद्रपूर ह्या सुद्धा दर्शनसाठी आल्या होत्या. मंदीराचे बाजुला प्रकाश भोयर महाराज यांचे किर्तन सुरु असल्याने सर्वजन तीथे किर्तन ऐकण्याकरीता बसले होते.शारदा गुलाबराव मेहपुरे सुद्धा तिथेच होत्या. दुपारी 1.00 वा. चे सुमारास महाराजांचे किर्तन संपल्याने शारदा मेहपुरे ह्या प्रकाश भोयर महाराज बसलेल्या ठिकाणी गेल्या व महाराजांचे दर्शन घेण्याकरीता त्या खाली वाकले असता फिर्यादीचे गळ्यात असलेला गोफ कोणीतरी अज्ञात ईसमाने ओढल्यसारखे वाटले, त्यांना गळ्यात गोफ दिसला नसल्याने फिर्यादीने याबाबत सोण्याचा गोफ वजन 12 ग्रॅम किंमत 5860 प्रती ग्रॅम असा एकुण 69,600/-रु. कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेला अशा प्रकारची जबानी रिर्पोट वरुन पोलिसांनी कलम 304 BNS गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन वणी करत आहे.
Previous Post Next Post