सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : येथील प्रख्यात साहित्यीक बाबाराव मडावी,आकांतकार यांचा भाकर कथा संग्रह गडचिरोली विद्यापिठात एम.ए.मराठी चे अंतिम वर्षाला अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला.त्यांचे आत्मकथन आकांत चा ही या विद्यापिठात एम.ए.भाग१ चे अभ्यासात समावेश करण्यात आला आहे.बाबाराव मडावी यांचे कथासंग्रह, आत्मकथन, कादंबरी,कविता अभ्यासक्रमात पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अहमदनगर, गडचिरोली विद्यापिठात एम.ए, बी.ए. ला समाविष्ठ झाले. बाबाराव मडावी यांचे साहित्य वाचनिय तथा अभ्यासनिय ठरले असुन सर्वञ आनंद व्यक्त करण्यात येत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्व सामाण्या तळागाळातील जीवन जगणारा माणुस केंद्रबिंदु समजुन त्यांचा विविध अंगाचा आलेख बाबाराव मडावी यांचे साहित्यातुन पहायला मिळतो.भाकर कथासंग्रहातील कथा सर्वसामाण्य माणसाच्या हक्कासाठी झुंजणा-या आहेत.त्यांच्या जगण्यातील व्यथा वेदना आक्रोश करीत विद्रोही रुप धारण करतात.व्यवस्थेला प्रश्न करीत जीवनाचा आदर्श छातीठोकपणे जगाला समजावुन सांगतात.घामावरची या कथासंग्रहातील दुनिया झोपडीच्या दारातुन ऊगवते.या कथासंग्रहातील माणसं केवळ आपलं दुःखच सांगत बसत नाहीत तर परिवर्तनाची अपेक्षा करतात.भाकरीसाठी तडफडणारी माणसं कष्टाचं प्रामाणिक त्यांचं जीणं हृदयाला हलवून सोडतं.या कथा संग्रहाच्या दोन आवृत्त्या निघाल्यात.