ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांनी केले वस्त्रदान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : विविध सणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई अत्रम यांनी वस्त्रदान केले. यासाठी त्यांना माणुसकीची भिंत, त्यांचे चिरंजीव तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, आकाशवाणी अधिकारी राहुल आत्राम आणि कविता आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले. 

पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कुवारा भीवसेन देवस्थानाच्या प्रांगणात त्यांनी गरजूंना कपडे वाटले. या वस्त्रदानाचा लाभ बहुसंख्य फिरस्ती फकीर आणि गरजूंनी घेतला. 

यावेळी पी. डी. आत्राम, प्रमोद चांदवडकर व मान्यवर उपस्थित होते. पुष्पाताई आत्राम ह्या विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सेवक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.