एक स्त्री आई मुलगी बहीण समाजात खरच एकटी सुरक्षित आहे का?

एक स्त्री आई मुलगी बहीण समाजात खरच एकटी सुरक्षित आहे का?

खूप जाळल्या मेणबत्त्या .....
आता तोडा शत्रूंच्या हड्ड्या .....
खूप काढले कँडल मार्च .....
आता करा त्या लोकांचा परदा फाश .....
नकोसा झालाय हा स्त्री जन्म.....
हेच झालंय आता कटू सत्य.....
जगावे तर कसे .....
पडले आता मला कोडे असे.....
एका मुलीचा जन्म म्हटला तर तिला नको म्हणून मारा पोटात.....
असा हा समाज वंश हवा तर तो मुलगाच सांगे मोठ्या थाटात.....
मग का लग्नाला मुली बघता.....
आणि त्यांचं जीवन बर्बाद करता.....
ती येते तुमच्या घरी मोठी स्वप्न इच्छा 
आकांशा घेऊन ओलांडून तुमच्या 
दाराचा उंबरठा.....
मग का ऐकू येतो तिच्या सगळ्या
स्वप्नाचा चुराडा आक्रोश हुंडाबळीचा
हंबरडा.....
का इतकं सगळ केल्यावर थांबत 
नाही तुमचं मन येत नाही तुम्हाला कीव.....
का घेता सहज पने तुम्ही तिचा जीव.....
का दिसत नाही तुम्हा नराधमाना 
ती आहे एक चिमुकली.....
तिच्यात आहे चिकाटी काहीतरी 
बनायची जिद्द तिला वाटे तिच्या संगे आहे सगळे ती नाही एकटी.....
पण हा तिचा गैरसमज .....
या समाजाला नाहीच त्याचा समज.....
ते घेतात त्याचा फायदा.....
तोडून टाकतात न्यायदेवतेचा कायदा.....
ती छोटीशी पाकळी असो की मग 
एक स्त्री मुलगी आई बहीण नाही
राहत त्याच त्याना भान.....
आणि या अशा समाजकंटकांमुळे 
नाही राहत त्यांना सामोरे जायला तिचा त्रान.....
होतो तिच्यावर बलात्कार.....
एक नाही दोन नाही असे किती तरी करतात
तिच्यावर अत्याचार....
ती करते प्रयत्न या सगळ्या परिस्थितीशी.....
झुंजन्याचा.....
कट असतो तिला संपवण्याचा.....
 तीच्यासोबतच्या पुराव्याच्या नाश 
करण्यासाठी घेतला जातो तिचा प्राण.....
आणि हे नराधम काही झालेच नाही 
म्हणून समाजात फिरतात दाखवतात
आपली आन बान शान.....
ती असते तिच्या घरची आई बहीण 
मुलगी एक लक्ष्मी तिची करतात ते
देवी सारखी पूजा.....
पण काही ठिकाणी तिचा करतात 
बाजार.....
करतात तिचा विकून व्यापार.....
आपल्या देशातील शेतकरी म्हणतो 
माझ्यावर सगळे अन्न धाण्यासाठी.....
आहेत अवलंबून......
तशीच ती एक मुलगी जी आपली
Night duty करून सेवा करण्यासाठी
होती हॉस्पिटल मधे थांबून.....
तिचे कर्तव्य करून ती गेली थोडी 
विश्राम करायला.....
तिला काय महिती होते तिच्या मागे 
होता एक नराधम काळ घालायला.....
आई वडील आपल्या चिमुरड्या पाठवतात 
शाळेत मोठ्या आशेने.....
पण तिथेही असतात काही नराधम
नाही जाणत ती एक पाकळी आहे
बघतात तिच्याकडे वाईट वासनेने.....
नाही केला चिमुरडीचा विचार.....
तिच्यावरही केला अत्याचार.....
बस झाल आता एकच विनंती सरकार.....
बंद करा हा अत्याचार.....
जसे दिले समान हकक महिला आरक्षण ....
तसे न्याय द्या आणि करा आमचे रक्षण.....
गरजूंना द्या लाडकी बहीण....
पण आम्हला द्या वचन नुसते वचनच नाही तर 
शिकवा त्याना धडा करा शासन.....
नाही तर मुलीला जन्म द्यायलाही घाबरेल हा 
समाज.....
बंद करा या नराधमांचा माज.....
"बेटी है माता पिता की आंगण का सोना'
हमको अपनी बेटी को नही खोना"

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव पदी विजय नगराळे यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : जिल्हयातील वणी येथील शाहू, फुले,आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे यांनी आजवर पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व शक्तिनिशी योगदान दिल्याबद्दल पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडित प्रल्हाद कांबळे यांनी विजय नगराळे यांची सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश या पदावर नियुक्ती केली. 

श्री.नगराळे यांनी सांगितले की,मी यवतमाळ जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुळ बळकट करण्यासासाठी झटणार. या निवडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.


न्या.वडणे समितीला मुदतवाढ मिळाल्याने गोंड गोवारी जमातीत आक्रोश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : आदिवासी गोंड गोवारी जमातीला न्याय देणारा दिनांक 18/12/2020 चा मा.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश क्रमांक 4096/2020 येऊन आज चार वर्षे पुर्ण होत आहे परंतु या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करण्याची हिम्मत महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग व महाराष्ट्र शासनाला होत नाही ही बाब भारतीय लोकशाही,संविधान, भारतीय न्यायव्यवस्था, पुरोगामी राज्याचा दिंडोरा पिटणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे.असे आज आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे अध्यक्ष माधव कोहळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकातुन म्हटले आहे.
      
 मा.सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयात मुद्दा क्रमांक 31,32,33 वर स्पष्ट नमुद आहे की,1955 ला भारत सरकारने नेमलेल्या काकासाहेब कालेलकर आयोगाने आदिवासी गोवारी जमातीची शिफारस आदिवासी जमात म्हणून केली.त्यानंतर दुसऱ्याच वर्षी 1956 ला गोवारी जमात गोंड जमाती सारखी भिमालपेन (भिवसनदेव), पेरसापेन (मोठादेव), जंगोदाई, ढाल,वाघोबा, नागोबा या देवतांची पुजा करणारी व गोंडी संस्कृती पाळणारी असल्यामुळे गोंड जमातीची उपजमात म्हणून गोंड गोवारी नावाने अनुसुचित जमाती सुधारणा कायदा 1956 द्वारे भारतीय संसदेने महाराष्ट्राच्या आदिवासीच्या सुचीत समाविष्ट केली.पुढे 1961 ला मध्यप्रांतातुन विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला तेंव्हा विदर्भातील आदिवासी जमातीचा सर्वे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात सोनेगाव या गावी झाला.त्या गावात नागोसे,नेहारे,राऊत इत्यादी अनेक आडनावाचे गोंड गोवारी आहेत असे नमुद करुन त्यानुसार तेंव्हाच्या वणी, केळापुर, यवतमाळ या यवतमाळ जिल्ह्यातील व सिरोंचा, गडचिरोली या चांदा जिल्ह्यातील व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट तालुका हे अनुसुचित क्षेत्र ठरवुन या क्षेत्रात गोंड गोवारी जमात असल्याचे 1961सर्वे अहवालात नमुद आहे.ही माहीती मा.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेश क्र.4096 मध्ये स्पष्टपणे अधोरेखीत केली आहे.पुढे 1976 मध्ये अनुसुचित जमातीसाठी लागू असलेला क्षेत्रबंधन कायदा भारताच्या संसदेने हटविल्यामुळे विदर्भातील संपुर्ण गोंड गोवारी जमात आरक्षणात आली.
         
याच निकालाच्या मुद्दा क्रमांक 83,87,92 नुसार जे गोवारी गोंड जमाती प्रमाणे भिमालपेन, पेरसापेन, जंगोदाई,ढाल, वाघोबा,नागोबा देवतांची उपासना करतात तेच गोंड गोवारी असल्याचे नमुद केले आहे. एवढा स्पष्ट निर्णय असताना महाराष्ट्र शासनाचे महाअधिवक्ता,शासनाचा विधी व न्याय विभाग,आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे चे आय.ए.एस.दर्जाचे आयुक्त,आदिवासी खात्याचे सचिव यांना हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश समजू नये ही या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी शोकांतिका आहे.म्हणून मागील सहा महीन्यापुर्वी नागपुर येथील तिव्र आंदोलना नंतर सेवानिवृत्त न्यायमुर्ती मा.के.एल.वडणे यांच्या अध्यक्ष खाली सुप्रिम कोर्ट आदेशाचा अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयातील माहीतीच्या बिलकुल विरुध्द असलेल्या व चुकीच्या असलेल्या 24 एप्रिल 1985 च्या जी.आर.मध्ये दुरुस्ती करण्यासाठी समिती नेमली.काल 6 सप्टेंबर ला या समीतीला दिलेली सहा महीन्याची मुदत संपली.तरी समितीचे एका कोर्ट आदेशाच्या निर्णयाच्या अभ्यासाचे काम पुर्ण झाले नाही.

काल राज्य शासनाने वडणे समितीला आणखी दोन महीन्यांची मुदत वाढवुन दिल्याचा जि.आर.काढल्याने गोंड गोवारी जमातीत तिव्र नाराजी व असंतोष पसरला आहे. त्यामुळे कालचा मुदतवाढीचा शासन निर्णय रद्द करुन त्वरित आचारसंहीता लागण्याआधी वडणे समिती कडुन अहवाल प्राप्त करुन कोर्ट निर्णयाची अंमलबजावणी करुन गोंड गोवारी जात व वैधता प्रमाणपत्र प्रदान करावे अन्यथा न्याय नाही तर मत नाही ही भुमिका घेत येत्या विधानसभा निवडणुकीवर संपुर्ण विदर्भात बहीष्कार टाकू असे आदिवासी आरक्षण संरक्षण समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पञकातुन शासनास कळविले आहे.

जि. प. शिक्षक निते सर यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ५ सप्टेंबर भारताचे २ रे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कानडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. निते सर यांचा कानडा ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सूषमा रूपेश ढोके यांचे वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहल जातं.
या प्रसंगी बोलताना निते सरांनी गावाचे आभार मानले. कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे विद्यार्थी, जनसेवा फाउंडेशन चे संचालक सुरज येवले, राजू आस्कर, हरीचंद्र डाहूले, दादा येवले, मनसे तालुकाध्यक्ष रूपेश ढोके, नानाजी धोबे, महादेव डाहूले, शूभम आस्कर होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरज येवले यांनी तर, आभारप्रदर्शन हरिश्चंद्र डाहूले यांनी केले.

आमच्या शेतीचा मोबदला द्या - सिंधी-महागाव ग्रामवासियांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : बेंबळा प्रकल्पाकडून काही लोकांना मोबदला मिळाला तर काही लोकांना अजूनही मोबदला मिळाला नाही, तो मोबदला द्यावा, अशा आशयचे निवेदन वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले. 

बेंबळा प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या गेल्या, तर 2018 मध्ये काही लोकांना त्याचा मोबदला मिळाला आहे. मात्र, गेल्या 2008 पासून उर्वरित काही शेतकऱ्यांना मोबदला अजूनही मिळालेला नाही असे निवेदन कर्त्यांचं म्हणणे आहे. याबाबत तक्रार शासन दरबारात आहे. व त्याचा निकाल कनिष्ठ न्यायालय पांढरकवडा यांनी दिलेला आहे. असे निवेदनात नमूद आहे. मात्र, वकील म्हणतात की, शासनाकडे पैसे नसल्याने तुमचे पैसे शासन देत नाही. शासनाकडे "पैसे नाहीत"...त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी वणी विधानसभा मतदार संघांचे लोकप्रतिनिधी संजीव रेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला न्याय द्यावा व आमची समस्या मार्गी लावावी अशी मागणी उपस्थित सिंधी-महागाव येथील प्रकल्प धारकांकडून करण्यात आली आहे. 

निवेदन देताना तालुका महामंत्री गणेश झाडे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर थेरे यांच्या उपस्थितीत प्रमोद झाडे, राकेश लेडांगे, अनिल घुगल, अरुण महारतळे, राहुल लेडांगे, चित्तरंजन येरमे, कुसुम कोसरे, गजानन कसारे, विकास महारतळे, रविंद्र नेहारे, सोनाबाई ठावरी, विठ्ठल डाहुले, बबन लांबट, शांताबाई बलकी या सह अनेक कास्तकार उपस्थिती होते.