सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : बेंबळा प्रकल्पाकडून काही लोकांना मोबदला मिळाला तर काही लोकांना अजूनही मोबदला मिळाला नाही, तो मोबदला द्यावा, अशा आशयचे निवेदन वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले.
बेंबळा प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या गेल्या, तर 2018 मध्ये काही लोकांना त्याचा मोबदला मिळाला आहे. मात्र, गेल्या 2008 पासून उर्वरित काही शेतकऱ्यांना मोबदला अजूनही मिळालेला नाही असे निवेदन कर्त्यांचं म्हणणे आहे. याबाबत तक्रार शासन दरबारात आहे. व त्याचा निकाल कनिष्ठ न्यायालय पांढरकवडा यांनी दिलेला आहे. असे निवेदनात नमूद आहे. मात्र, वकील म्हणतात की, शासनाकडे पैसे नसल्याने तुमचे पैसे शासन देत नाही. शासनाकडे "पैसे नाहीत"...त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी वणी विधानसभा मतदार संघांचे लोकप्रतिनिधी संजीव रेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला न्याय द्यावा व आमची समस्या मार्गी लावावी अशी मागणी उपस्थित सिंधी-महागाव येथील प्रकल्प धारकांकडून करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका महामंत्री गणेश झाडे व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर थेरे यांच्या उपस्थितीत प्रमोद झाडे, राकेश लेडांगे, अनिल घुगल, अरुण महारतळे, राहुल लेडांगे, चित्तरंजन येरमे, कुसुम कोसरे, गजानन कसारे, विकास महारतळे, रविंद्र नेहारे, सोनाबाई ठावरी, विठ्ठल डाहुले, बबन लांबट, शांताबाई बलकी या सह अनेक कास्तकार उपस्थिती होते.
आमच्या शेतीचा मोबदला द्या - सिंधी-महागाव ग्रामवासियांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 07, 2024
Rating: