राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव पदी विजय नगराळे यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : जिल्हयातील वणी येथील शाहू, फुले,आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे यांनी आजवर पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व शक्तिनिशी योगदान दिल्याबद्दल पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडित प्रल्हाद कांबळे यांनी विजय नगराळे यांची सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश या पदावर नियुक्ती केली. 

श्री.नगराळे यांनी सांगितले की,मी यवतमाळ जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुळ बळकट करण्यासासाठी झटणार. या निवडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव पदी विजय नगराळे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव पदी विजय नगराळे यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on September 07, 2024 Rating: 5
Powered by Blogger.