बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्या सरकार विरोधात महिलांचा आक्रोश मोर्चा


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : देशामध्ये वाढत्या महिला अन्याय अत्याचार ब्लात्कार हत्याच्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ बुधवार दि.०४ सप्टेंबर बुधवार रोजी निर्भय नारी विचार मंच पांढरकवडा च्या वतीने महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.तसेच बलात्कार करणाऱ्याना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा व कायदयांचा मुंडन करून निषेध ही करण्यात आला.तसेच देशामधे जेवढयाही बलात्कार,हत्या झालेल्या आहे,त्यांचा जलदगतीने न्यायालयामार्फ़त न्याय मिळावा व कायद्यामध्ये महिला सुरक्षेच्या विशेष तरतूदी शासनाने कराव्यात.

क्रूर,अमानवीय घटनांच्या दोषीना मृत्युदंड कायदा करावा अशा महिला सुरक्षेबाबत विविध मागण्या मा.तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार पांढरकवडा यांचे मार्फत मा.मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना करण्यात आल्या.नुकताच कलकत्ता येथे घडलेले महिला डॉक्टर प्रकरण,राळेगाव,चंद्रपुर,मणिपुर,आसिफा,प्रियंका रेड्डी,निर्भया,हाथरस ह्या घटनातर मानवतेला काळीमा फासणाऱ्या व घटना आहेत,याचे आरोपी आजही मोकाट फिरत आहेत,प्रज्वल रेवन्ना या नराधमाने तर एक हजार पेक्षा जास्त महिलांची आब्रु लुटुन,विडिओ करून त्यांना ब्लैकमेल केल्याची घटना उघड़कीस येवून सुद्धा अशा नराधमाना पाठीशी घालण्याचे कार्य सरकार द्वारे होत आहे,त्यामुळे कितीतरी पीडिता अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत यातनादायी जीवन जगत आहेत.म्हणूनच हेच कुठे तरी थांबविले पाहिजे ह्या उद्देशाने निर्भय नारी विचार मंच आता रस्त्यावर उतरला आहे.असे परखड़ मत महिला आक्रोश मोर्चाचे आयोजकानी जनतेसमोर मांडले आहे.महिला आक्रोश मोर्च्याची सुरवात "we want justice" 'फासी दो फासी दो,बलात्काऱ्याला फासी' द्या नाऱ्यानी आवाज घुमला बिरसामुंडा चौक पासुन ते अग्रसेन चौक,दीपक जनरल चौक मार्गे तहसील अशी होती.

तहसील कार्यालयासमोर मोर्च्यात सामिल झालेल्या समाजातील प्रतिष्ठित महिला एडवोकेट मा.शिला जनपदकर,मा.ज्योती शामकुवर,तृतीय पंथी संघतनेच्या मा.कांचन ताई,मा.हेमलता डोंगरे,मा.चंदा नरांजे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले,तसेच वाणी तोड़ासे,नीता मडावी,डॉ.विद्याश्री आत्राम,मनीषा गोरलेवार यांनी देखील मोर्चा संभाळला होता.निर्भय नारी विचार मंचाच्या या धाडसी निर्णयाला पांढरकवडा शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा जाहिर केला होता.तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवरानी मोर्च्यात उपस्थिती दर्शविली होती.इंग्लिश मीडियम स्कुल व अन्य शाळा देखील मोर्च्यात सामिल झाल्या होत्या.सुवर्णा वरखडे,वाणी तोडासे,नीता मडावी,डॉ.विद्याश्री आत्राम,मनीषा गोरलेवार व समस्त निर्भय नारी विचार मंच टीम कडून महिला आक्रोश मोर्चा यशस्वी होण्याकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुवर्णा वरखडे यांनी केले.

डोलडोंगरगाव येथील तान्हा पोळा उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : डोल डोंगरगाव येथे दरवर्षी आयोजित होणारा तान्हा पोळा यंदाही मोठ्या उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला. 

या उत्सवात गावातील असंख्य बालकांनी आपल्या नंदीला सजवून तसेच स्वतः आकर्षक वेशभूषा करून तान्हा पोळा अतिशय उत्साहामध्ये साजरा केला.

यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पालक, आजी,आजोबा, मित्र परिवार व गावातील मान्यवर उपस्थित होते. सर्व बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

विजय चोरडिया यांचा 55 वा वाढदिवस: वणी विधानसभा क्षेत्रात हा दिवस उत्सहात साजरा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक दातृत्वाचे धनी श्री. विजयबाबू चोरडिया आज (4 सप्टेंबर) 55 वा वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्ताने वणी विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून जल्लोष व्यक्त केला आहे.
समाजसेवेत नेहमी अग्रेषित असणाऱ्या विजयबाबुंचा वाढदिवस त्यानिमित्ताने वणी उपविभागात मित्र, स्नेही व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. समर्थक जल्लोष व्यक्त करत अनेक कार्यक्रमाचंही आयोजन केले जात आहेत. वाढदिवसाच्या दिवशी विजयबाबुंचा गोकुळनगर, रंगनाथ स्वामी मंदिर, जैताई मंदिर व कायर अशा वेगवगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी शहरातील विविध धार्मिक स्थळांचे दर्शन व पूजा करून ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा सह आशीर्वाद तसेच सत्कार त्यांनी स्विकारला.
बुधवारी समाजसेवी विजय चोरडिया 55 वर्षांचे झाले आणि भाजपा पदाधिकारी आणि समर्थकांनी वणी विधानसभा मतदार संघात सामाजिक उपक्रमांचे दिवसभर आयोजन केले होते. भाजपाचे विविध नेते, उद्योजक, साधू संत, महंत, पत्रकार आणि ज्ञात लोकांकडून अनेक शुभेच्छांचा वर्षाव झाला. 
विनायक मंगल कार्यालय, (कायर रोड) वणी येथे वाढदिवस निमित्त सायंकाळी "स्वर जल्लोष" संगीतमय संध्याचे आयोजन स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते, या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री भारत सरकार तथा ओबीसी आयोगाचे हंसराज भैय्या अहीर ह्यांची विशेष उपस्थित होती. यावेळी त्यांनी विजयबाबू यांना निरोगी,दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. व त्यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. या अभिष्टचिंतन सोहळ्यात वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, आरोग्यासंदर्भात असलेले भरीव कार्य तथा योगदान काय असतं यांची शुभचिंतकांना प्रचिती दिली. माजी सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, पवन एकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. समाजसेवी विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाला शेकडो महिला व पुरुषांनी अ‍ॅड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला. 
या सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या राजकीय व सामाजिक मान्यवरांचे प्रेम तथा लक्षणीय उपस्थिती पाहुण श्री विजय चोरडिया हे भारावून गेले होते, जेवढे आभार धन्यवाद मानावे तेवढे कमीच असल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व म्हणाले की,असेच प्रेम सदैव असुद्या, अशीच लोकसेवा माझ्या हातून घडत राहो यासाठी आपला आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या, सर्वांचे आभार व्यक्त करतो, एवढं बोलून त्यांचे मन गहिवरले.

आज मारेगाव येथे जल्लोष व अभिष्टचिंतन सोहळा:
आज गुरुवार 5 सप्टेंबर ला दुपारी 2 वा. राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ “स्वागत व अभिष्टचिंतन” (सोहळा) चा एक भाग म्हणून, भारतीय जनता पक्ष मारेगाव तालुका शाखेच्या वतीने आज त्यांचा "वाढदिवस" साजरा येथील स्थानिक शेतकरी सुविधा केंद्र मध्ये आयोजन करण्यात आले आहे.

सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाले - आ.संजीवरेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभेचा आमदार म्हणुन दोन पंचवार्षिक मध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपला सर्वाचा आशिर्वाद मिळाला, मी आपल्या कर्तव्यात कुठलाही दुजाभाव केला नाही. त्यामुळे मला सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळाले आहे. असे प्रतिपादन वणी विधान सभा मतदार संघाचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी केले ते महागाव (सिंधी) येथील विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच अविनाश लांबट होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा निलीमा थेरे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, प्रदिप डाहुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर बलकी, माजी उपसभापती पवन मिलमिले, जेष्ठ नागरिक मनोहर नेहारे, ग्राम पंचायत सदस्य संगिता वाघाडे, विमल आत्राम, हे मंचावर उपस्थित होते. 
पुढे बोलताना ते म्हणाले की,आपल्या सर्वांच जे प्रेम माझ्या आहे,भविष्यातही आपले प्रेम सदैव कायम असुद्या. कर्तव्यात मी कुठेही कमी पडणार नाही. उद्धवजी सोबत असताना दुरदैवाने राज्याचे अडीज वर्षे नुकसान झालं. विकास झाला नाही, त्यानंतर मात्र,शिंदे भाजपा सरकार स्थापन झाली आणि या अडीज वर्षाच्या सत्तेत एवढा प्रचंड निधी दिला जो पंचवीस वर्षाच्या काळात कोणी दिला नाही. याच भावनेतून आपल्या गावाला एवढा निधी प्राप्त झाला आणि त्यातून जो विकास साधता आला ते काही कमी नाही,असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार बोदकुरवार यांचे वाजत गाजत ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात आले होते. 
या प्रसंगी इतरही मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, सरपंचा यांनी सिंधी गावाला निधी दिला त्याबद्दल आमदार साहेब यांचे मनस्वी आभार व धन्यवाद मानले. यावेळी परिसरातील नागरिकांनी इतरही समस्यांचे निवेदन सादर करून उर्वरित कामाची आग्रही मागणी केली. त्यावर शक्य जेवढे करता येइल त्याची ग्वाही दिली. 
प्रास्ताविक पवन मिलमिले, सुत्रसंचालन अमोल गुरनुले यांनी तर,आभार गणेश खुसपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रविण बोथले, गजु लांबट, सुरज गाडगे, पंढरी लांबट, प्रदिप पिंपळशेंडे, ललीत पिंपळशेंडे,आदींनी मेहनत घेतली. यावेळी गावातील महिला पुरुष व युवक आणि बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. 

तरुण शेतकऱ्याची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची धग थाबता थांबेना. ऐन बडग्याच्या दिवशी 3 सप्टेंबर ला सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान पठारपूर येथील एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे.

सुनील भाऊराव उलमाले (३५) असे त्याचे नाव असून यांनी आपल्या राहते घरी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची दुःखद घटना उघडकीस आली.

सुनील याने विषारी द्रव प्राशन केल्याचे नातेवाईकांना कळताच त्यांनी प्रथम कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र,प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारार्थ वणी येथील ग्रामीण रूग्णालयात रात्री दाखल केले असता डॉक्टरांनी तपासूणी करून त्याला मृत घोषित केले. त्याच्या अशा अकाली निधनाने पठारपुर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुनील कडे चार एकर शेती आहे. त्याचसोबत मक्त्याने शेती केली होती. सुनील यांनी एकदम आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का? उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे.

मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.