बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्या सरकार विरोधात महिलांचा आक्रोश मोर्चा


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : देशामध्ये वाढत्या महिला अन्याय अत्याचार ब्लात्कार हत्याच्या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ बुधवार दि.०४ सप्टेंबर बुधवार रोजी निर्भय नारी विचार मंच पांढरकवडा च्या वतीने महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.तसेच बलात्कार करणाऱ्याना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा व कायदयांचा मुंडन करून निषेध ही करण्यात आला.तसेच देशामधे जेवढयाही बलात्कार,हत्या झालेल्या आहे,त्यांचा जलदगतीने न्यायालयामार्फ़त न्याय मिळावा व कायद्यामध्ये महिला सुरक्षेच्या विशेष तरतूदी शासनाने कराव्यात.

क्रूर,अमानवीय घटनांच्या दोषीना मृत्युदंड कायदा करावा अशा महिला सुरक्षेबाबत विविध मागण्या मा.तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार पांढरकवडा यांचे मार्फत मा.मुख्यसचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना करण्यात आल्या.नुकताच कलकत्ता येथे घडलेले महिला डॉक्टर प्रकरण,राळेगाव,चंद्रपुर,मणिपुर,आसिफा,प्रियंका रेड्डी,निर्भया,हाथरस ह्या घटनातर मानवतेला काळीमा फासणाऱ्या व घटना आहेत,याचे आरोपी आजही मोकाट फिरत आहेत,प्रज्वल रेवन्ना या नराधमाने तर एक हजार पेक्षा जास्त महिलांची आब्रु लुटुन,विडिओ करून त्यांना ब्लैकमेल केल्याची घटना उघड़कीस येवून सुद्धा अशा नराधमाना पाठीशी घालण्याचे कार्य सरकार द्वारे होत आहे,त्यामुळे कितीतरी पीडिता अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत यातनादायी जीवन जगत आहेत.म्हणूनच हेच कुठे तरी थांबविले पाहिजे ह्या उद्देशाने निर्भय नारी विचार मंच आता रस्त्यावर उतरला आहे.असे परखड़ मत महिला आक्रोश मोर्चाचे आयोजकानी जनतेसमोर मांडले आहे.महिला आक्रोश मोर्च्याची सुरवात "we want justice" 'फासी दो फासी दो,बलात्काऱ्याला फासी' द्या नाऱ्यानी आवाज घुमला बिरसामुंडा चौक पासुन ते अग्रसेन चौक,दीपक जनरल चौक मार्गे तहसील अशी होती.

तहसील कार्यालयासमोर मोर्च्यात सामिल झालेल्या समाजातील प्रतिष्ठित महिला एडवोकेट मा.शिला जनपदकर,मा.ज्योती शामकुवर,तृतीय पंथी संघतनेच्या मा.कांचन ताई,मा.हेमलता डोंगरे,मा.चंदा नरांजे यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले,तसेच वाणी तोड़ासे,नीता मडावी,डॉ.विद्याश्री आत्राम,मनीषा गोरलेवार यांनी देखील मोर्चा संभाळला होता.निर्भय नारी विचार मंचाच्या या धाडसी निर्णयाला पांढरकवडा शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा जाहिर केला होता.तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवरानी मोर्च्यात उपस्थिती दर्शविली होती.इंग्लिश मीडियम स्कुल व अन्य शाळा देखील मोर्च्यात सामिल झाल्या होत्या.सुवर्णा वरखडे,वाणी तोडासे,नीता मडावी,डॉ.विद्याश्री आत्राम,मनीषा गोरलेवार व समस्त निर्भय नारी विचार मंच टीम कडून महिला आक्रोश मोर्चा यशस्वी होण्याकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुवर्णा वरखडे यांनी केले.
बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्या सरकार विरोधात महिलांचा आक्रोश मोर्चा बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्या सरकार विरोधात महिलांचा आक्रोश मोर्चा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.