सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाले - आ.संजीवरेड्डी बोदकुरवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभेचा आमदार म्हणुन दोन पंचवार्षिक मध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपला सर्वाचा आशिर्वाद मिळाला, मी आपल्या कर्तव्यात कुठलाही दुजाभाव केला नाही. त्यामुळे मला सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळाले आहे. असे प्रतिपादन वणी विधान सभा मतदार संघाचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी केले ते महागाव (सिंधी) येथील विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच अविनाश लांबट होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा निलीमा थेरे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, प्रदिप डाहुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर बलकी, माजी उपसभापती पवन मिलमिले, जेष्ठ नागरिक मनोहर नेहारे, ग्राम पंचायत सदस्य संगिता वाघाडे, विमल आत्राम, हे मंचावर उपस्थित होते. 
पुढे बोलताना ते म्हणाले की,आपल्या सर्वांच जे प्रेम माझ्या आहे,भविष्यातही आपले प्रेम सदैव कायम असुद्या. कर्तव्यात मी कुठेही कमी पडणार नाही. उद्धवजी सोबत असताना दुरदैवाने राज्याचे अडीज वर्षे नुकसान झालं. विकास झाला नाही, त्यानंतर मात्र,शिंदे भाजपा सरकार स्थापन झाली आणि या अडीज वर्षाच्या सत्तेत एवढा प्रचंड निधी दिला जो पंचवीस वर्षाच्या काळात कोणी दिला नाही. याच भावनेतून आपल्या गावाला एवढा निधी प्राप्त झाला आणि त्यातून जो विकास साधता आला ते काही कमी नाही,असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार बोदकुरवार यांचे वाजत गाजत ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात आले होते. 
या प्रसंगी इतरही मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, सरपंचा यांनी सिंधी गावाला निधी दिला त्याबद्दल आमदार साहेब यांचे मनस्वी आभार व धन्यवाद मानले. यावेळी परिसरातील नागरिकांनी इतरही समस्यांचे निवेदन सादर करून उर्वरित कामाची आग्रही मागणी केली. त्यावर शक्य जेवढे करता येइल त्याची ग्वाही दिली. 
प्रास्ताविक पवन मिलमिले, सुत्रसंचालन अमोल गुरनुले यांनी तर,आभार गणेश खुसपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रविण बोथले, गजु लांबट, सुरज गाडगे, पंढरी लांबट, प्रदिप पिंपळशेंडे, ललीत पिंपळशेंडे,आदींनी मेहनत घेतली. यावेळी गावातील महिला पुरुष व युवक आणि बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. 

सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाले - आ.संजीवरेड्डी बोदकुरवार सामान्य माणसांच्या ह्रदयात स्थान मिळाले - आ.संजीवरेड्डी बोदकुरवार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.