सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील गौराळा गावातील प्रफुल प्रभाकर भोयर याने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल त्याचे अखिल भारतीय सरपंच संघटना, मारेगाव तर्फे जल्लोषात स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.
एका अल्पभूदारक शेतकऱ्याच्या मुलाने जिद्दीने चिकाटीने हे करून दाखवलं. आई वडिलांच्या कष्टाचं चीज झाले. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे भोयर यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली.
बालपणापासूनच पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणारा प्रफुल याने आपल्या अफाट मेहनत आणि स्व:कर्तृत्वाने हे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाने केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण तालुका व गौराळा गाव गौरवान्वित झाले आहे. मुलगा एक दिवस पोलीस अधिकारी बनेल, असे स्वप्न त्याच्या वडिलांचे होते. हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झाले आहे. प्रफुल यांनी वडिलांचे स्वप्न लहानपणापासूनच डोळ्यासमोर ठेवून मेहनत केली आणि आज त्यांनी ते पूर्ण करून दाखवले असे मत सरपंच परिषदेचे ता. अध्यक्ष अविनाश लांबट यांनी "सह्याद्री चौफेर"ला बोलताना व्यक्त केले.या प्रसंगी वडिलांचे सुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. भविष्यात चांगल्या कामगिरीसाठी अखिल भारतीय सरपंच परिशदेतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पंचायत समिती मारेगावचे गट विकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, अ.भा स.प.सचिव सुरेश लांडे, सरपंच प्रवीण नान्हे, सरपंच संदीप कारेकर, सरपंच चंदू जवादे, सरपंच राहुल आत्राम, सरपंच चंद्रकांत धोबे, सरपंच ललिता तुराणकर, सरपंच निलेश रासेकर,सरपंच गोवर्धन तोडासे, उपसरपंच प्रशांत भंडारी, उपसरपंच महेश आत्राम, उपसरपंच सुनील देऊळकर, सरपंच सुरेखा चिकराम, रोजगारसेवक खुशाल येरगुडे, वंचित चे ता.अध्यक्ष गौतम दारुंडे, मारोती तुराणकर,आदींची उपस्थिती होती.