टॉप बातम्या

आगामी विधानसभेसाठी दोन मतदान केंद्रांची वाढ; मारेगाव तालुक्यात नऊ केंद्राचे मतदारांच्या सोयीसाठी विभाजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीकोनातून मतदारांच्या सोयीसाठी तालुक्यात दोन केंद्रात वाढ केली आहे तर, सहा केंद्रात मागणी नुसार विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना आता मतदान करणे पूर्वी पेक्षा जवळ सोयीचे होणार आहे.
              
तालुक्यातील काही गावातील मतदारांना मतदान केंद्रावर पाच ते सात किमी चे अंतर पार करुन मतदान करायला जावे लागत होते. त्यामुळे मतदान करायला जाणे गैरसोयीचे होत असल्याने याचा परिणाम मतदानावर होत असे. त्यामुळे कमी अंतरावर मतदान केंद्र द्यावे, अशी मागणी मतदारांनी केली होती. याबाबत आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक डिमन टोंगे आदींनी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदार संघांचे उत्तम निलावाड यांच्या कडे करण्यात आली होती. 

आलेल्या सूचनाचा विचार करून मा. उपविभागीय अधिकारी वणी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 76 वणी विधानसभा मतदारसंघ यांचे मार्गदर्शनखाली तहसीलदार मारेगांव यांनी खैरगाव बुटी आणि मेंढणी या गावात नवीन मतदान केंद्र निर्माण केले आहे. तर नरसाळा येथील दोन केंद्रा पैकी घोडदरा येथे एक केंद्र देण्यात आले आहे. मच्छिन्द्रा येथील दोन केंद्रा पैकी एक 'डोलडोंगरगाव, गौराळा येथील दोन केंद्रा पैकी एक वरुड, नवरगाव येथील दोन केंद्रा पैकी एक टाकरखेडा, बुरांडा (ख) येथील दोन केंद्रा पैकी एक हटवांजरी,तर सिंधी (म) येथील दोन केंद्रा पैकी एक केंद्र महागाव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
          
तर दापोराचे मतदार बोरी (बु) येथून काढून चिंचमंडळ येथे, खापरीचे मतदार करणवाडी केंद्रातून काढून बुरांडा (ख) येथे तर, आवळगाव येथील मतदार जळका येथून काढून खैरगाव भेदी येथील मतदान केंद्रात जोडण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी मागणी केली त्यांच्या मागणीला यश आले असून ज्या ज्या गावांना सोयीचे झाले त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यासाठी महसूल प्रशासनाने हे काम अतिशय तातडीने तडीस लावले असून नव्या बदलाची मतदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदारसंघ उत्तम निलावाड यांनी केले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();