टॉप बातम्या

शाळांची अवस्था बिकट; विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटई भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारी शाळांमध्ये कमी होणाऱ्या पटसंख्येमागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता शासनाकडून पुरेशा सुविधा नसल्याने सरकारी शाळा ओस पडत आहे. मात्र, जे विद्यार्थी शाळेत आहे त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यासाठी नगर परिषद शाळा (वणी) क्रमांक ५ येथील शिक्षक विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे चित्र संजय खाडे यांना दिसले. 

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. गरिबांना मदत असो, शिक्षणासाठी मदत असो किंवा शेतकऱ्यांना कोणती अडचण असेल तर ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी संजय खाडे यांनी नगर परिषद शाळा क्रमांक ५ ला भेट दिली. शाळेची अवस्था व्यवस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान शाळेचे दार, खिडक्या तुटलेले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, फरशी फुटलेली, अशा नानाविध समस्या तिथे होत्या. तिथे शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता चटई ची आवश्यकता असल्यामुळे संजय खाडे यांनी ताबडतोब विद्यार्थ्यांकरीता चटई देण्याचे आश्वासन दिले आणि लगेचच दोन दिवसात शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता चटई भेट स्वरूपात दिली. 

यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत गोहकार, प्रा. शंकर वऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी, अरुण चटप, तेजराज बोढे, अंकीतवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री.खाडे यांच्या हस्ते चटई भेट स्वरूपात स्वीकारताना शाळेच्या मुख्यद्यापिका मिना काशीकर, सहाय्यक शिक्षिका रजनी पोयाम, कोंगरे, डंबारे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();