सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील छोट्याशा खैरगाव गावातील प्रकाश मोतीराम उईके यांचा मुलगा नितेश उईके हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र राज्य सहा प्राध्यापक पात्र परिक्षा (सेट) ७ एप्रिल २०२४ घेण्यात आली होती. यात त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेचा निकाल दि.५ ऑगस्ट २०२४ ला याचा निकाल लागला असून वाणिज्य शाखेतून नितेश उईके हा उत्तीर्ण झाला आहे.
त्याचे शिक्षण एम कॉम असुन त्याचेवर अभिनंदन सह कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई दुर्गा व वडील प्रकाश यांना दिले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रा. अविनाश घरडे, डॉ. संतोष गायकवाड, कुलकर्णी सर, तानोरकर मॅडम, खाडे सर, पवार सर, गुंडावार सर, अंदूरकर सर व मित्र परिवारांनी कौतुक केले आहे.