ओला दुष्काळ जाहीर करा - मनसेची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : सतत च्या नापिकीने व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढलेले असल्याने अशा परिस्थितीत मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी आज मनसेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली. 

मारेगाव तालुका हा मागास तालुका असुन, मारेगांव तालुक्यातील जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी हे अल्पभुधारक असुन, मागील २-३ वर्षापासुन पिकांच्या नुकसानीने शेतकरी हा मेटाकुटीस आला आहे. महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देखील वाढलेले आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांना अतिवृष्टी चा सामना करावा लागत आहे. मागील १०-१५ दिवसापासुन सतत होणाऱ्या पावसाने शेतक-यांच्या पिकांना नुकसान सहन करावे लागत असुन अनेकवेळा खते, बि-बियाणे, फवारण्या ह्या विनाकारण व्यर्थ गेलेल्या असुन आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

त्यामुळे मारेगांव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करुन स्थळ पंचनामा करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान प्रदान करण्यात यावे अशी मागणी तालुका अध्यक्ष रुपेश ढोके यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना करण्यात आली आहे. 

निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, महिला अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, शहराध्यक्ष चांद बहादे, विभाग अध्यक्ष रोशन शिंदे, आदित्य बुचे, सुनील आत्राम, गणेश धाबेकर, आरती राठोड, वसंता घोटेकार, सिंधुताई बेसकर या असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.