आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक..


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक काम करत असताना कलात्मक चपळाईने बारकाईने लक्षपूर्वक व नवीन नवीन दृष्टिकोनाने कार्य करावे लागतात आधुनिकच्या युगामध्ये प्रत्येकाने डिजिटल चा उपयोग करणे आवश्यक असून कौशल्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या युगात टिकून राहू शकतो तंत्रज्ञान वापरताना शास्त्रीय कारण प्रात्यक्षिक, लेखी माहिती चा अभ्यास करून त्यात तज्ञ होणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन कौशल्य आणि डिजिटल या विषयावर सागर मुने यांनी वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे प्रत्येक बाबतीत व जीवनात कौशल्याचा उपयोग कसा करायचा असे सांगितले.

22 जुलै ते 28 जुलै पर्यंत शासनातर्फे शैक्षणिक सप्ताह नगरपरिषद शाळा क्रमांक पाच मध्ये राबविण्यात आला यात सांस्कृतिक शैक्षणिक श्रमदान स्वच्छता कलावंत डिजिटल माध्यम अशा विषयांद्वारे शैक्षणिक सप्ताह साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे सर्व शाळांना आदेश दिलेले आहे. नगर परिषद शाळा क्रमांक 5 मध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. या शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन दि. 22 जुलैला करण्यात आले. याप्रसंगी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधनांची प्रदर्शनी भरविण्यात आली.
        
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे या शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या शिक्षण सप्ताहामध्ये 22 जुलै पासून शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे अध्ययन-अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाइफ च्या दृष्टिकोनातून इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस अशा पद्धतीने सात दिवस विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

समुदाय सहभाग दिनानिमित्त दि. 28 जुलैला पालक सभा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काशीकर यांनी अध्यक्षीय भाषण केले व प्रास्ताविक रजनी पोयाम, संचालन कोंगरे आभार डंबारे यांनी केले.