सौ शर्मिला वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


|भि|ष्ट|चिं|| | वा||दि||

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं !
मा. सौ. शर्मिला वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक : संतोष रोगे 
यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना 


'हम दो हमारे बारा' चित्रपटाला विरोध

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

यवतमाळ : 'हम दो हमारे बारा' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रतिबंध लावावा, अशी मागणी विदर्भ मुस्लिम संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वतीने राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
'हम दो हमारे बारा' हा चित्रपट मुस्लिम समाजाला लक्ष बनवून निर्माण केल्याचा आरोप होत आहे. सदर चित्रपटात मुस्लिम समाजाविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. मुस्लिम समाजाविषयी द्वेष निर्माण केल्या जात आहे. समाजातील धार्मिक रूढींना दर्शवून समाजात अराजकता, सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याचा चित्रपट निर्मात्यांच्या हा प्रयत्न आहे. चित्रपटात मुस्लिम समाजाबद्दल चुकीची माहिती प्रदर्शित करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. यामुळे हा चित्रपट कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येऊ नये या चित्रपटावर प्रतिबंध लावून चित्रपट निर्माते व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 
या विषयाचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष शब्बीर खान, कार्यकारी अध्यक्ष जावेद परवेज अन्सारी, उपाध्यक्ष असलम खान यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. चित्रपट प्रदर्शनाला रोखण्यात यावे, अशी मागणी करताना समाजभावना लक्षात घ्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

अज्ञात व्यक्तीकडून शेतकऱ्याच्या शेतातील रासायनिक खत जाळण्याचा प्रयत्न, तर कंपाउंडची नासधूस

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी वर्ग सामना करीत असतानाच मारेगाव तालुक्यातील मुकटा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील लाकडी खांब त्यावरील ताराचे कंपाऊड मोडमाड, नासधूस करून व शेतात साठवून ठेवण्यात आलेले रासायनिक खत अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्याचा प्रयत्न केल्याबाबतची तक्रार आज मारेगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली. 
सुधाकर चंपत चवले रा. कानडा असे शेतकऱ्याचे नाव असून यांचे मालकीची व ताब्यातील शेतजमीन मौजा मुकटा येथील शेत गट नं. ६६/२ हा आहे.
घटना अशी की, मारेगाव तालुक्यातील कानडा येथील मागासवर्गीय शेतकरी सुधाकर चंपत चवले यांचे मुकटा हद्दीतील शेत गट नं. ६६/२ आहे. शेतीचा हंगाम अगदी तोंडावर आल्याने खरीपाची मशागत करून वरूण राजाची शेतकरी वाट पाहत आहे. शेत मालाचा बचाव म्हणून शेतकरी वर्ग कंपाउंड करतात. त्यांनी सुद्धा शेताला लाकडी खांब गाडुन त्यावर ताराचे कंपाऊड केले आहे. तसेच कानडा येथून मुकटा ने- आन करिता लांब पडत असल्यामुळे शेतातच रासायनिक खत शेतकऱ्याने झाकुन ठेवले होते. शेतीमधील रासायनिक खत व ताराचे कंपाउंड गुरुवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून शेताचे कंपाउंडची मोडतोड करून व झाकून ठेवलेले रासायनिक खत पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, आज शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता शेतकऱ्याच्या ही गंभीर बाब निदर्शनास आली, असे शेतकरी पुत्राने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
आधीच शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजातील काही विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत याला आळा घालावा अशी मागणी तक्रारकर्ता शेतकऱ्याचा मुलगा प्रशांत सुधाकर चवले (वय 29) यांनी केली आहे.

उत्पादन वाढीसाठी खरीप पिकाची लागवड बेडवर करा

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : उत्पादन वाढीसाठी खरीप पिकाची लागवड बेडवर करा असे मार्गदर्शन कृषी तज्ञ् यांनी कासारबेहळ व वरोडी येथील शेतकऱ्यांना केले. हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितलं. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नवनवीन हवामान अनुकूल शेती पद्धती व तंत्रज्ञानावर भर देण्यात येत असून कृषी हवामान विभागानुसार तंत्रज्ञान अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यामध्ये पिकांची बेडवर लागवड करणे, शून्य मशागत तंत्रज्ञान व बी बी एफ तंत्रज्ञा हवामान अनुकूल असल्याने पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. 

प्रकल्प क्षेत्रामध्ये जमिनीची रचना, जमीनधारणा आणि पावसातील लहरीपणा लक्षात घेऊन सपाट जमिनीवर लागवडीपेक्षा गादीवाफे तयार करून त्यावर केलेली लागवड अधिक अनुकूल असल्याने उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. सरी,वरंबा तयार करून टोकन पद्धतीने पिकांची लागवड करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष,मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय पुसद येथे कार्यरत असलेले तंत्रज्ञान समन्वयक नितीन रिठे यांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये रुंद वाफ्यावर (बेडवर) पिकांची लागवड करण्यासाठी, सरी वरंबे तयार करणे, खत व्यवस्थापन, मानवचलित टोकण यंत्राच्या साह्याने सोयाबीन, कापूस, तूर पिकांची लागवड करणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खरीप हंगामामध्ये तयार केलेले सरी वरंबे (बेड) ठेवून तसेच पुढील हंगामामध्ये याच बेड वर पुढील पिकाची लागवड करून शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे. यावेळी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

आज नंदूभाऊ मस्के कासारबेहळ यांच्या सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी बेड ची पाहणी करण्यात आली.यावेळी नितिन रिटे, नंदु आडे कृषी सहाय्यक साईनाथ झरेवाड कृषी सहाय्यक कासारबेहळ हे हजर होते. त्याचसोबत शेतकरी उल्हास पाटील अडकिने, वरोडी हे सुद्धा उपस्थित होते.

नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस सेवा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : सध्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.