सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी वर्ग सामना करीत असतानाच मारेगाव तालुक्यातील मुकटा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील लाकडी खांब त्यावरील ताराचे कंपाऊड मोडमाड, नासधूस करून व शेतात साठवून ठेवण्यात आलेले रासायनिक खत अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्याचा प्रयत्न केल्याबाबतची तक्रार आज मारेगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली.
सुधाकर चंपत चवले रा. कानडा असे शेतकऱ्याचे नाव असून यांचे मालकीची व ताब्यातील शेतजमीन मौजा मुकटा येथील शेत गट नं. ६६/२ हा आहे.
घटना अशी की, मारेगाव तालुक्यातील कानडा येथील मागासवर्गीय शेतकरी सुधाकर चंपत चवले यांचे मुकटा हद्दीतील शेत गट नं. ६६/२ आहे. शेतीचा हंगाम अगदी तोंडावर आल्याने खरीपाची मशागत करून वरूण राजाची शेतकरी वाट पाहत आहे. शेत मालाचा बचाव म्हणून शेतकरी वर्ग कंपाउंड करतात. त्यांनी सुद्धा शेताला लाकडी खांब गाडुन त्यावर ताराचे कंपाऊड केले आहे. तसेच कानडा येथून मुकटा ने- आन करिता लांब पडत असल्यामुळे शेतातच रासायनिक खत शेतकऱ्याने झाकुन ठेवले होते. शेतीमधील रासायनिक खत व ताराचे कंपाउंड गुरुवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून शेताचे कंपाउंडची मोडतोड करून व झाकून ठेवलेले रासायनिक खत पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, आज शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता शेतकऱ्याच्या ही गंभीर बाब निदर्शनास आली, असे शेतकरी पुत्राने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
आधीच शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजातील काही विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत याला आळा घालावा अशी मागणी तक्रारकर्ता शेतकऱ्याचा मुलगा प्रशांत सुधाकर चवले (वय 29) यांनी केली आहे.
अज्ञात व्यक्तीकडून शेतकऱ्याच्या शेतातील रासायनिक खत जाळण्याचा प्रयत्न, तर कंपाउंडची नासधूस
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2024
Rating: