'हम दो हमारे बारा' चित्रपटाला विरोध

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

यवतमाळ : 'हम दो हमारे बारा' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रतिबंध लावावा, अशी मागणी विदर्भ मुस्लिम संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वतीने राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
'हम दो हमारे बारा' हा चित्रपट मुस्लिम समाजाला लक्ष बनवून निर्माण केल्याचा आरोप होत आहे. सदर चित्रपटात मुस्लिम समाजाविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. मुस्लिम समाजाविषयी द्वेष निर्माण केल्या जात आहे. समाजातील धार्मिक रूढींना दर्शवून समाजात अराजकता, सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याचा चित्रपट निर्मात्यांच्या हा प्रयत्न आहे. चित्रपटात मुस्लिम समाजाबद्दल चुकीची माहिती प्रदर्शित करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. यामुळे हा चित्रपट कोणत्याही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येऊ नये या चित्रपटावर प्रतिबंध लावून चित्रपट निर्माते व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 
या विषयाचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष शब्बीर खान, कार्यकारी अध्यक्ष जावेद परवेज अन्सारी, उपाध्यक्ष असलम खान यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. चित्रपट प्रदर्शनाला रोखण्यात यावे, अशी मागणी करताना समाजभावना लक्षात घ्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.
'हम दो हमारे बारा' चित्रपटाला विरोध 'हम दो हमारे बारा' चित्रपटाला विरोध Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.