उत्पादन वाढीसाठी खरीप पिकाची लागवड बेडवर करा

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : उत्पादन वाढीसाठी खरीप पिकाची लागवड बेडवर करा असे मार्गदर्शन कृषी तज्ञ् यांनी कासारबेहळ व वरोडी येथील शेतकऱ्यांना केले. हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे झाले आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितलं. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नवनवीन हवामान अनुकूल शेती पद्धती व तंत्रज्ञानावर भर देण्यात येत असून कृषी हवामान विभागानुसार तंत्रज्ञान अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यामध्ये पिकांची बेडवर लागवड करणे, शून्य मशागत तंत्रज्ञान व बी बी एफ तंत्रज्ञा हवामान अनुकूल असल्याने पिकांच्या वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. 

प्रकल्प क्षेत्रामध्ये जमिनीची रचना, जमीनधारणा आणि पावसातील लहरीपणा लक्षात घेऊन सपाट जमिनीवर लागवडीपेक्षा गादीवाफे तयार करून त्यावर केलेली लागवड अधिक अनुकूल असल्याने उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. सरी,वरंबा तयार करून टोकन पद्धतीने पिकांची लागवड करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष,मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय पुसद येथे कार्यरत असलेले तंत्रज्ञान समन्वयक नितीन रिठे यांनी सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये रुंद वाफ्यावर (बेडवर) पिकांची लागवड करण्यासाठी, सरी वरंबे तयार करणे, खत व्यवस्थापन, मानवचलित टोकण यंत्राच्या साह्याने सोयाबीन, कापूस, तूर पिकांची लागवड करणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खरीप हंगामामध्ये तयार केलेले सरी वरंबे (बेड) ठेवून तसेच पुढील हंगामामध्ये याच बेड वर पुढील पिकाची लागवड करून शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब करण्यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे. यावेळी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

आज नंदूभाऊ मस्के कासारबेहळ यांच्या सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी बेड ची पाहणी करण्यात आली.यावेळी नितिन रिटे, नंदु आडे कृषी सहाय्यक साईनाथ झरेवाड कृषी सहाय्यक कासारबेहळ हे हजर होते. त्याचसोबत शेतकरी उल्हास पाटील अडकिने, वरोडी हे सुद्धा उपस्थित होते.
उत्पादन वाढीसाठी खरीप पिकाची लागवड बेडवर करा उत्पादन वाढीसाठी खरीप पिकाची लागवड बेडवर करा Reviewed by सह्याद्री चौफेर on June 07, 2024 Rating: 5
Powered by Blogger.