इंजि. राहुलभाऊ लोखंडे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा...!

"अभिष्टचिंतन"

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला दादा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा भाऊसाहेब ..! 
सामायिक केलेल्या आठवणी, अविस्मरणीय साहस आणि अंतहीन हास्याच्या आणखी पुढील वर्षासाठी शुभेच्छा. जन्मदिनाच्या शुभेच्छा, माझ्या भावा. “तुम्हाला पुढील वर्ष रोमांचक संधी, नवीन यश आणि सुंदर क्षणांनी भरलेले जावो.” “माझ्या आश्चर्यकारक भावासाठी, तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच अविश्वसनीय असू दे.
"Wish you Happy Birthday Rahulji

शुभेच्छुक : कैलास मेश्राम 
सह परिवार भालेवाडी, (ता.मारेगाव)

फसगत झालेल्या प्रियशीने पोलिसात दिली प्रियकराविरोधात तक्रार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 'सिर्फ तुम' म्हणायचं पहिलीला आणि जीवनसाथी बनवायचं दुसरीला. त्यामुळे आपली फसगत झालेल्या प्रियशीने पोलिसात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. ही घटना तालुक्यातील रोहपट येथील असून प्रेमवीरा मध्ये एकच खळबळ उडाली. 

मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील युवकाचे सहा वर्षांपूर्वी तीचेशी संबंध आले.तेव्हा पासून दोघांचं नातं घट्ट होत गेलं व 'एक दुजे के लिए' प्रेमात म्हणत तू मेरी आणि मै तेरा, आणभाका घेत 8 नोव्हेंबर 2022 ला आरोपीने या मुलीला 16 नोव्हेंबर 2022 ला घराचा वास्तू असल्याचे बोलला. त्या दिवसाला आपण लग्न उरकून घेऊ असे सांगून आठवडा भर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचा असा प्रकार सुरूच होता. त्याच वय 23 आणि ती वयात नसल्याने ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करण्यासाठी सुचना दिल्या.तसे आरोपीकडून होकर सुद्धा मिळाला. 

अशातच दिवसामागे दिवस उलटून जात असताना प्रियकराने 1 मे 2024 ला दुसऱ्या मुलीशी लग्न केले. हे कळताच त्या मुलीच्या पायाखालची जागा सरकली मोठा धक्का बसला. प्रेमभंग झालेल्या प्रेयसीने अखेर प्रियकराविरोधात ठाण्यात धाव घेत तक्रार केली.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम 376 (2) (प), 506, बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 3 (अ), 4, 5 (आय) 6 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
    

‘ईव्हीएम’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

छत्रपती संभाजीनगर : ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

यासंदर्भात आज दि.७ रोजी अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, त्यांचे मोबाईलवर मारोती ढाकणे असे नांव सांगणाऱ्या इसमाने मतदान केंद्रात निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम मशीनला माझ्याकडील विशिष्ट प्रकारची चीप बसवुन तुमच्या उमेदवारास जास्तीत जास्त मतदान करून देतो असा बहाणा करून त्या मोबदल्यात मला अडीच कोटी रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. या प्रकरणाचे गांभीय लक्षात घेवुन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी पवार, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमून हे पथक राजेंद्र दानवे यांचे सोबत रवाना केले.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर इसम मारोती ढाकणे यांने राजेंद्र दानवे यांना मध्यवर्ती बस स्थानक समोरील हॉटेल न्यू मॉडर्न टि हाऊस स्विट अॅण्ड स्नॅक्स, छत्रपती संभाजीनगर येथे बोलविले होते. या ठिकाणी राजेंद्र दानवे, साध्या गणवेषातील पोलीस पथक व पंच असे सापळा लावुन थांबलेले असतांना मारूती ढाकणे हा त्या ठिकाणी आला. त्याने राजेंद्र दानवे यांना सांगितले कि, माझ्याकडे एक विशिष्ट प्रकारची चीप असुन दिनांक 13/05/2024 रोजी मतदानाच्या दिवशी विशिष्ट प्रकारची चिप मतदान केंद्रामध्ये जावुन EVM मशीनला बसविण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे फक्त तुमच्याच उमेदवारास जास्तीत जास्त मतदान मिळेल,असे सांगुन मोबाईलवर संभाषणात ठरल्याप्रमाणे अडीच कोटी रूपयांपैकी तडजोडीअंती दीड कोटी रुपयांची मागणी करून आज टोकन रक्कम म्हणुन एक लाख रूपयांची मागणी केली. त्याप्रमाणे राजेंद्र दानवे यांच्याकडुन त्याने एक लाख रुपये स्वीकारतांना पंचासमक्ष सापळा लावुन बसलेल्या साध्या वेशातील पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. या इसमाचे त्याचे पुर्ण नाव मारोती नाथा ढाकणे, वय-42 वर्षे, व्यवसाय- आर्मी हवालदार, उदमपुर, जम्मु, रा. काटेवाडी, पो. खरवंडी कासार, ता. पाथर्डी जि. अहमदनगर असे त्याने सांगितले. या इसमास ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर अवघड, सय्यद मोसिन, पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार, पोह विजयानंद गवळी, सचिन शिंदे, भगीनाथ बोडखे, विठ्ठल मानकापे, गणेश शिंदे, परमेश्वर भोकरे, संदीप जाधव, नितीश घोडके आर्थिक गुन्हे शाखा यांनी केली.

त्या बाळतीन माहिलेचा मृतदेह विहिरीत आढळला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रसूतीला नुकतेच पंधरा दिवस होऊन, त्या नवविवाहित महिलेचा गावातीलच विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. ही मन हेलावणारी घटना मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोटोणी येथे घडली. 

शुभांगी विपुल लालसरे (अंदाजे वय 23) असे शासकीय विहिरीत आढळून आलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. मृतक ही पंधरा दिवसाअगोदर गरोदरपणात होती. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, ती अचानक काल रात्री घरून निघून गेली, याबाबत आज दिवसभर तीच्या घर सोडून जाण्याचे किंबहुना बेपत्ता असल्याचे छायाचित्र सह माहिती सोशल माध्यमातून वायरल होत होती. 

प्राप्त माहितीनुसार भाजप चे जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे यांच्या परिवारात गोंडस पाहुण्यांचे (नातू) आगमन झाले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु हे आनंदाचे क्षण चिंतेच्या सावटात परिवर्तीत झाल्याने लालसरे यांची स्नुषा ही चौदा दिवसाच्या बाळाला सोडून गेल्याने तीचा कुटुंबातील सदस्यांसह गावकऱ्यांनी तालुका व जंगल शिवार तसेच इतरत्र ठिकाणी शोध घेतला परंतु शुभांगी कुठेच मिळाली नाही. अखेर सर्वजण गावाकडे परतले, अशातच तीच्या पायातील चप्पल गावातील जलवाहिनीत आढळल्याने शंका निर्माण होताच काहींनी गळ विहिरीत सोडला असता तीचा मृतदेहच गळाला लागला. 

या मन हेलावणाऱ्या घटनेने तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून संबंधित प्रशासनाने मृतदेह ऊत्तरीय तपासणी करिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर उद्या (8 मे) बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता च्या आसपास शुभांगी हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बोटोणी येथे करण्यात येणार असल्याची माहिती लालसरे कुटुंबीयांच्या निकटवरतीयांनी दिली. 

दुष्काळात तेरावा महिना! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ.. असे आहे नवीन दर...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सततच्या दुष्काळामुळे आधीच शेतकरी राजा त्रस्त असून यातच आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मिश्र खते, सुपर फास्फेट, पोटॅश यांच्या भावात वाढ झाली. 

ट्रॅक्टरमार्फत होणाऱ्या आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रति एकर दोन ते तीनशे रुपयांपर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून, २००० ते २२०० रुपये प्रति एकर नांगरणी झाली आहे खते, बियाणे, रोजगार आणि मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहेत. मात्र, शेतमालाचे बाजारभाव स्थिर आणि घटताच आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांभोवतीच आहेत. सद्यःस्थितीत तर ४ हजार ६०० रुपये भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजार भाव घटणारे आणि खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे चित्र आहे

 वाढलेले खत दर..
खताचे नाव - जुने दर - नवे दर
• १०•२६•२६, १४७० - १७००
• २०•२०•१३, १२५० - १४००
• २४•२४•०, १५५० - १७००
• सुपर फास्फेट ५०० - ५५०