सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
सततच्या दुष्काळामुळे आधीच शेतकरी राजा त्रस्त असून यातच आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मिश्र खते, सुपर फास्फेट, पोटॅश यांच्या भावात वाढ झाली.
ट्रॅक्टरमार्फत होणाऱ्या आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रति एकर दोन ते तीनशे रुपयांपर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून, २००० ते २२०० रुपये प्रति एकर नांगरणी झाली आहे खते, बियाणे, रोजगार आणि मशागतीसाठी लागणारे यंत्र याच्या बाजारभावात नियमित वाढच होत आहेत. मात्र, शेतमालाचे बाजारभाव स्थिर आणि घटताच आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांभोवतीच आहेत. सद्यःस्थितीत तर ४ हजार ६०० रुपये भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजार भाव घटणारे आणि खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे चित्र आहे
वाढलेले खत दर..
खताचे नाव - जुने दर - नवे दर
• १०•२६•२६, १४७० - १७००
• २०•२०•१३, १२५० - १४००
• २४•२४•०, १५५० - १७००
• सुपर फास्फेट ५०० - ५५०
दुष्काळात तेरावा महिना! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ.. असे आहे नवीन दर...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 07, 2024
Rating: