सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शुभांगी विपुल लालसरे (अंदाजे वय 23) असे शासकीय विहिरीत आढळून आलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. मृतक ही पंधरा दिवसाअगोदर गरोदरपणात होती. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र, ती अचानक काल रात्री घरून निघून गेली, याबाबत आज दिवसभर तीच्या घर सोडून जाण्याचे किंबहुना बेपत्ता असल्याचे छायाचित्र सह माहिती सोशल माध्यमातून वायरल होत होती.
प्राप्त माहितीनुसार भाजप चे जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे यांच्या परिवारात गोंडस पाहुण्यांचे (नातू) आगमन झाले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु हे आनंदाचे क्षण चिंतेच्या सावटात परिवर्तीत झाल्याने लालसरे यांची स्नुषा ही चौदा दिवसाच्या बाळाला सोडून गेल्याने तीचा कुटुंबातील सदस्यांसह गावकऱ्यांनी तालुका व जंगल शिवार तसेच इतरत्र ठिकाणी शोध घेतला परंतु शुभांगी कुठेच मिळाली नाही. अखेर सर्वजण गावाकडे परतले, अशातच तीच्या पायातील चप्पल गावातील जलवाहिनीत आढळल्याने शंका निर्माण होताच काहींनी गळ विहिरीत सोडला असता तीचा मृतदेहच गळाला लागला.
या मन हेलावणाऱ्या घटनेने तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून संबंधित प्रशासनाने मृतदेह ऊत्तरीय तपासणी करिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर उद्या (8 मे) बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता च्या आसपास शुभांगी हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बोटोणी येथे करण्यात येणार असल्याची माहिती लालसरे कुटुंबीयांच्या निकटवरतीयांनी दिली.
त्या बाळतीन माहिलेचा मृतदेह विहिरीत आढळला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 07, 2024
Rating: