सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील युवकाचे सहा वर्षांपूर्वी तीचेशी संबंध आले.तेव्हा पासून दोघांचं नातं घट्ट होत गेलं व 'एक दुजे के लिए' प्रेमात म्हणत तू मेरी आणि मै तेरा, आणभाका घेत 8 नोव्हेंबर 2022 ला आरोपीने या मुलीला 16 नोव्हेंबर 2022 ला घराचा वास्तू असल्याचे बोलला. त्या दिवसाला आपण लग्न उरकून घेऊ असे सांगून आठवडा भर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचा असा प्रकार सुरूच होता. त्याच वय 23 आणि ती वयात नसल्याने ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करण्यासाठी सुचना दिल्या.तसे आरोपीकडून होकर सुद्धा मिळाला.
अशातच दिवसामागे दिवस उलटून जात असताना प्रियकराने 1 मे 2024 ला दुसऱ्या मुलीशी लग्न केले. हे कळताच त्या मुलीच्या पायाखालची जागा सरकली मोठा धक्का बसला. प्रेमभंग झालेल्या प्रेयसीने अखेर प्रियकराविरोधात ठाण्यात धाव घेत तक्रार केली.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम 376 (2) (प), 506, बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 3 (अ), 4, 5 (आय) 6 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
फसगत झालेल्या प्रियशीने पोलिसात दिली प्रियकराविरोधात तक्रार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 08, 2024
Rating: