मुदत बाह्य औषधी फेकणे आले अंगलट, त्या मेडिकलचा परवाना रद्द

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सहा महिन्यापूर्वी मारेगाव वनपरीक्षेत्रात येत असलेल्या जळका बिट मधील पांढरदेवी परिसरात मुदत सपंलेल्या औषधे फेकणाऱ्या मेडिकल चा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही कारवाई औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रेयश डिस्ट्रीब्युटर्स वितरक टागोर चौक वणी असे परवाना रद्द झालेल्या मेडिकल चे नाव आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात आली होती. जंगलात फेकलेल्या औषधांच्या पेट्यांवरील बॅच वरून गुन्हा निश्चित करण्यात आला आहे.
10 नोव्हेंबरला श्रेयश डिस्ट्रीबुटर्सचा परवाना कायम स्वरुपात रद्द करण्याचा आदेश पारित झाला असल्यामुळे मेडिकल संचालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे. श्रेयश डिस्ट्रीबुटर्सचा परवाना रद्द करण्यात आला असला तरी 90 दिवसांनंतर अंमलात येणार आहे.

आधार कार्डसंबंधी 'हे' काम 14 डिसेंबरपर्यंत करा पूर्ण, अन्यथा तुम्ही येणार अडचणीत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सर्व सरकारी योजना, बँक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड महत्वाचे असते. अशा वेळी आता सरकारने आधारकार्ड संबंधी एक नवीन अपडेट आणले आहे.

14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट
यावेळी UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेटसाठी14 डिसेंबर* ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार अपडेट केले नाही, तर त्यानंतर तुमची अनेक कामे अडकू शकतात. याशिवाय तुमच्यासोबत सायबर फसवणुकीचा धोकाही वाढेल. एवढेच नाही तर 14 डिसेंबरनंतर तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला फी देखील भरावी लागेल.

घरबसल्या ऑनलाइन कसे अपडेट करायचे?
● सर्वप्रथम तुम्ही https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html या लिंकवर क्लिक करा.
● त्यानंतर तुम्ही वेबसाइटवर आधार अपडेटचा पर्याय निवडा.
● तुम्हाला जी गोष्ट अपडेट करायची आहे त्या ऑप्शनवर क्लिक करा.
● यानंतर तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर लिहा आणि ओटीपी टाका.
● त्यानंतर तुम्ही Documents Update वर जा आणि पर्याय निवडा.
● यानंतर, तेथे पाहून आधारशी संबंधित तपशीलांची पडताळणी करा.
● पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
● त्यानंतर तुम्ही आधार अपडेट प्रक्रियेवर जा आणि ते स्वीकारा.
● हे केल्यानंतर तुम्हाला 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) नंबर मिळेल.
● तुम्ही हे URN नोंदवावे. अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड अपडेट प्रक्रिया पूर्ण करू शकता.

मात्र तुम्हाला तुमचे डोळे आणि बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल.

दर 10 वर्षांनी अपडेट करणे गरजेचे आहे
आधार कार्डची नोडल बॉडी UIDAI च्या नियमांनुसार, एकदा आधार कार्ड बनवल्यानंतर, दर 10 वर्षांनी ते अपडेट करणे आवश्यक आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही आधारवर जाऊन हे काम करू शकता. कार्ड सेंटर किंवा स्वतः. तुम्ही ऑनलाइन जाऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. यासाठी यूजरला त्याची जन्मतारीख, मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर गोष्टींची माहिती द्यावी लागेल.


सीबीएससी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सीबीएससीनं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही सीबीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ही डेटाशीट तपासता येणार आहे. 

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून ती १३ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. सकाळी १०.३० वाजता पेपर्सना सुरुवात होणार आहे. देशभराती सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा..


वंचित बहुजन आघाडीचा 'खबरदार' बेधडक मोर्चा आज

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : जनतेच्या विविध मागण्यांना घेवून वंचित बहुजन आघाडीचा आज 13 डिसेंबर ला दुपारी 2 वाजता 'खबरदार' बेधडक मोर्चा येथील तहसील कार्यालयावर तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत धडकणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा संपन्न होणार आहे. या मोर्चात राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनचा वापर न करता, निवडणुका ह्या पारदर्शक पध्दतीने बॅलेट पेपरवर घेण्यात यावे, वणी विधानसभा क्षेत्रातील मागील 10 वर्षात आर. व्ही. उंबरकर या कन्स्ट्रक्शन्स कंपनीने प्रधानमंत्री सडक योजना व इतर योजनेतील सा. बां. विभाग पांढरकवडा कडुन स्वत: व सबलेटेड टेंडर घेवुन बांधकाम केलेल्या सर्व रस्त्यांचे टेक्नीकली ऑडीट करण्यात यावे, सर्व निराधारांना मासिक अनुदान भत्ता हा वाढत्या महागाई नुसार 5 हजार रूपये करण्यात यावे, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लागणारी उत्पन्नाची अट 21 हजार रूपयावरून 1 लाखांपर्यंत करण्यात यावे, निराधार लाभार्थ्यांची वय मर्यादा 60 वर्ष करण्यात यावे, सर्व दिव्यांग निराधार व्यक्तींना उद्योगासाठी 2 लाखाचे कर्ज अनुदान म्हणुन देण्यात यावे, शेतक-यांच्या कापसाला किमान 12 हजार रूपये तर सोयाबिनला 8 हजार प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा योजनेचा लाभ देण्यात यावा, नागपुर ते मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस तात्काळ पुर्ववत सुरू करण्यात यावी, सर्व सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना शासकीय नौकरी मिळेपर्यंत 10 हजार रूपये मासिक अनुदान भत्ता देण्यात यावा, शासकीय यंत्रणेचे खासगीकरण तत्काळ थांबविण्यात यावे व सर्व स्पर्धा परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात याव्यात, वणी येथिल कोल डेपो, कोल वॉशरीज कोळसा साईडींगमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण वाढले असुन मानवी स्वास गुदमरल्या जात आहे. तरी कोलडेपो, कोल वॉशरीज कोळसा साईडींग तत्काळ मानवी वस्तीच्या 5 किलो मिटर अंतरावर हटविण्यात यावे, राज्यात दलित समाजावर होत असलेले अन्याय,अत्याचार तत्काळ थांबविण्यात यावे व अॅट्रासिटी कायदा आणखी सक्त करण्यात यावा, वणी वेकोली क्षेत्रातील सर्व खासगी कंपन्यांमध्ये व मुकूटबन येथिल सिमेंट प्लॉन्ट येथे स्थानिक बेरोजगरांना 80 टक्के रोजगार देण्यात यावा, दिलीप भोयर यांचेवर रस्ता बांधकाम ठेकेदार उंबरकर यांनी खोटी तक्रार देवुन गुन्हा नोंद केला आहे. त्याची योग्य चौकशी करून तो गुन्हा मागे घेण्यात यावा,इत्यादी 15 मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चाच्या यशस्वितेसाठी मिलिंद पाटील, मंगल तेलंग, अर्चना कांबळे, किशोर मुन, वैशाली गायकवाड, शारदा मेश्राम, राजू चापडे, प्रा. आनंद वेले, विशाल कांबळे, वसीम शेख, कपिल मेश्राम, अर्चना नगराळे, प्रणिता ठमके, नंदिनी ठमके, किर्ती लभाने, अंजू पासवान, आदी परिश्रम घेत आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : खरीप (जुलै 2023) मध्ये तालुक्यात अतीवृष्टी होऊन अनेक शेतक-यांच्या जमीनी उभ्या पिकासह खरवडून गेल्या होत्या, त्यावेळी अनेक अधिकरी पदाधिकरी यांनी प्रत्यक्ष मोका पाहणी करुन सरकार आपल्या पाठीशी असल्याचे अभिवचन दिले होते. परंतू या आश्वासनांचा विद्यमान सरकारला पूरता विसर पडला असून, या खरवडून गेलेल्या जमिनीच्या मशागतीकरीता प्रचंड खर्च येणार असून अद्याप शासनाकडून एक रुपयासुध्दा नुकसानग्रस्ताना मिळाला नसल्याने, त्या झालेल्या अवकाळी नुकसानीची आर्थिक मदत, खरवडून गेलेल्या जमिनीच्या दुरुस्तीकरिता भरीव मदत व खरीप हंगाम 2023 पिक विम्याची रक्कम शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना अदा करावी अशी आग्रही मागणी वणी तालुका राष्ट्रवादी शाखेच्या वतीने करण्यात निवेदनातून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली. 

तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपा सह रब्बी हंगामातील पिकांची प्रचंड नासाडी मोठ्या प्रमाणात झाल्याने आपण कुटुंब प्रमुख आहात म्हणून वरील नमूद विषयी त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच शेतकऱ्यांनी उतरविलेल्या पिक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम वणी तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांनाच दिवाळीपूर्वी मिळाली व अनेकांना अद्यापही मिळालेली नाही तसेच काही लोकांना केवळ 10 ते 90 रुपये त्यांचे खात्यावर जमा करुन विमाकंपनी शेतकऱ्याची चेष्ठा करीत आहे, हे योग्य नाही. असे मत जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी आमच्या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले.

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावे व शेतकऱ्यांच्या कापसाला 12 ते 15 हजार रुपये व सोयाबीन ला 7 ते 8 हजार रुपये भाव देण्यात यावा अशी एकमुखी मागणी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे (शरद पवार समर्थक) यांच्या नेतृत्वात वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते आबीदभाई, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे, ता. का. अध्यक्ष खुशाल बासमवार, ओबीसी सेल चे गुणवंत टोंगे यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होती.