मुदत बाह्य औषधी फेकणे आले अंगलट, त्या मेडिकलचा परवाना रद्द

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सहा महिन्यापूर्वी मारेगाव वनपरीक्षेत्रात येत असलेल्या जळका बिट मधील पांढरदेवी परिसरात मुदत सपंलेल्या औषधे फेकणाऱ्या मेडिकल चा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही कारवाई औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
श्रेयश डिस्ट्रीब्युटर्स वितरक टागोर चौक वणी असे परवाना रद्द झालेल्या मेडिकल चे नाव आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात आली होती. जंगलात फेकलेल्या औषधांच्या पेट्यांवरील बॅच वरून गुन्हा निश्चित करण्यात आला आहे.
10 नोव्हेंबरला श्रेयश डिस्ट्रीबुटर्सचा परवाना कायम स्वरुपात रद्द करण्याचा आदेश पारित झाला असल्यामुळे मेडिकल संचालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे. श्रेयश डिस्ट्रीबुटर्सचा परवाना रद्द करण्यात आला असला तरी 90 दिवसांनंतर अंमलात येणार आहे.
मुदत बाह्य औषधी फेकणे आले अंगलट, त्या मेडिकलचा परवाना रद्द मुदत बाह्य औषधी फेकणे आले अंगलट, त्या मेडिकलचा परवाना रद्द Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.