20 वर्षीय युवकाने घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील आत्महत्येची धग दिवसागणिक वाढतच असुन शहरातील शास्त्री नगर येथील एका 20 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना रात्री 9 वाजता उघडकीस आली आहे. 
अनिकेत विजय आवारी (20) रा शास्त्री नगर, असे गळाफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मृतक हा आपल्या आई सह राहत होता. त्याची आई कामाला गेली असता अनिकेतने मंगळवार 12 डिसेंबर ला रात्री 9 वाजता च्या दरम्यान, आपल्या राहत्या घरी कुणीही नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या अशा निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
       
अनिकेतच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन सदरची माहीती वणी पोलीस स्टेशन ला मिळतास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलिस प्रशासन करीत आहे.
20 वर्षीय युवकाने घेतला गळफास 20 वर्षीय युवकाने घेतला गळफास Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.