सह्याद्री चौफेर | राजू डावे
अहमदनगर जिल्ह्यातील विनोदी किर्तनकार व समाज प्रबोधनकार म्हणून अख्या महाराष्ट्राला पोट धरून हसवणारे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनातून समाज प्रबोधन, समाजातील कुप्रथा वर आपल्या विनोदी शैलीत ते शब्दांचा मारा करतात. ते युट्युब या सोशल माध्यमातून समाज प्रबोधन करताना सर्वांनी बघितलं आहे, आता हेच प्रबोधन प्रत्यक्ष बघता यावे व त्याचा लोटपोट होऊन आनंद व ऐकता यावा, यासाठी प्रा. टिकाराम कोंगरे यांनी त्यांच्या कार्यक्रमाची उपलब्धी वणीकरांना करून दिली आहे.
आज बुधवार ला शासकीय मैदान येथे होणाऱ्या त्यांच्या भव्य किर्तनाचा वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आज वणीत प्रसिद्ध इंदोरीकर महाराज येणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2023
Rating: