सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्यायाम असणं अत्यंत गरजेचे झाले असून व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. मात्र, यासाठी विशिष्ट जागा, मैदान उपलब्ध असणे अतिशय आवश्यक आहे,तेव्हाच माणूस, खेळाडू फिट राहतो. परंतु मारेगाव तालुक्यात जेष्ठ नागरिकांना सोडा युवा खेळाडूंना खेळण्यासाठी कुठलेही नियोजित ग्राउंड उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील खेळाडू खेळापासून वंचित राहून मैदानी खेळापासून क्रीडा प्रेमी दुर होत असून तालुका क्रीडा संकुल वर कोणाचेही 'फोकस' नसल्याची खंत येथील क्रीडा प्रेमी कडून व्यक्त होत आहे.
तालुक्यात तालुका क्रीडा संकुल व्हावे यासाठी विविध संघटनांकडून निवेदने देण्यात आली होती. सतत च्या मागणीमुळे अखेर प्रशासनाला जाग येत तिन वर्षापूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तालुका क्रीडा संकुलची जागा निश्चित करण्यात आली. परंतु 3 वर्षाचा काळ लोटून सुद्धा क्रीडा संकुल प्रश्न थंड बस्त्यात असून यासाठी कोणती अडचण येत आहे की, यात राजकारण होत आहे. असा सवाल खेळाडू, क्रीडा प्रेमी कडून केल्या जात आहे.
मारेगाव तालुका हा मागासलेला तालुका असं म्हटलं जातं. मात्र, याच मागासलेल्या तालुक्यात उत्कृष्ट असे खेळाडू आहे, अनेक खेळ खेळले जातात. प्रामुख्याने क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, खोखो, लंगडी असे खेळ खेळण्याची हौस खेळाडू मध्ये आहे. परंतु खेळाडूंना खेळा साठी ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे त्याचा खेळ हद्दपार होत आहेत. केव्हा होणार तालुका क्रीडा संकुल?, सध्याचे त्या जागेवर किमान खेळ खेळण्यासाठी ग्राउंड तरी बनवून द्यावे, अशी आग्रही मागणी एलेव्हन स्टार क्रीडा संघाच्या खेळाडूंनी केली आहे.
तालुका क्रीडा संकुल वर कोणाचेही 'फोकस' नसल्याची खंत इलेव्हन स्टार क्रीडा संघानी केली व्यक्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2023
Rating: