सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तुमची नोकरी सरकारी असो वा खासगी. कर्मचारी ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत सर्वांना ठराविक कालावधीपर्यंत एकाच संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी सुविधेचा लाभ हा मिळतोच. परंतु, आता प्रश्न हा उरतो की, तुम्ही नोकरी सोडल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर किती दिवसानंतर ग्रॅच्युइटीसाठी दावा करु शकता. काय सांगतो नियम तसेच काय आहे ग्रॅच्युइटीसाठी दावा करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
ग्रॅच्युइटीसाठी तुम्हाला अर्ज कधीपर्यंत करता येतो?
गुंतवणूक सल्लागार स्विटी मनोज जैन यांच्या म्हणण्यानुसार, ग्रॅच्युइटी कायदा, 1972 नुसार कोणत्याही कंपनीला कर्मचाऱ्याने काम सोडल्यानंतर वा राजीनामा दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत ग्रॅच्युइटीची रक्कम देणं आवश्यक आहे.
स्वाभाविक आहे की, कर्मचाऱ्यांनेही 30 दिवसांच्या आत ग्रॅच्युइटीसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. जर कर्मचारी स्वतः अर्ज करू शकत नसेल तर त्याने अधिकृत केलेल्या व्यक्तीमार्फत 30 दिवसांच्या आत अर्ज करु शकतो.
ग्रॅच्युइटीसाठी दावा करण्याची प्रक्रिया
• नोकरी सोडल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर 30 दिवसांच्या आत कर्मचाऱ्याला फॉर्म 'I' भरावा लागेल.
• जर कर्मचार्याने आपला नॉमिनी म्हणून दुसर्या कोणाची नियुक्ती केली असेल किंवा अधिकृत केली असेल, तर त्याला फॉर्म 'J' भरावा लागेल आणि तो कंपनीला द्यावा लागेल.
• अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत, तुमची कंपनी त्यावर उत्तर देईल.
• जर नियमांनुसार अर्ज योग्य असेल आणि तुमची ग्रॅच्युइटी झाली असेल, तर कंपनी संपूर्ण रकमेचा तपशील फॉर्म 'L' मध्ये भरेल.
• कंपनी तुम्हाला एक निश्चित तारीखदेखील सांगेल, ज्यामध्ये तुम्हाला ग्रॅच्युइटी दिली जाईल. ही वेळमर्यादा तुमच्या अर्जापासून 30 दिवसांच्या आत असावी. अशा प्रकारे ग्रॅच्युइटीचा दावा आपण करू शकतो.
नोकरी सोडल्यानंतर ग्रॅच्युइटीची रक्कम कशी आणि कधी काढता येते? पहा काय सांगतो नियम..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2023
Rating: