टॉप बातम्या

लोकअदालतीच्या आयोजनातून मारेगावात 94 प्रकरणांचा निपटारा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या निर्देशानुसार न्यायालयात खितपत पडलेल्या प्रकरणाचा जलद गतीने निपटारा व्हावा, यासाठी शासनाच्यावतीने लोक अदालतीचे आयोजन न्यायालयाच्या माध्यमातून केले जाते.

मारेगाव न्यायालयाच्यावतीने शनिवार दि.9 डिसेंबर रोजी मारेगाव न्यायालयात लोक अदालत घेण्यात आली. यावेळी पॅनल हेडप्रमुख न्यायधीश निलेश वासाडे होते. दर तीन महिन्यांनी होणारे अनादर प्रकरणे 10, दंडाच्या 81 केसेस, खावटी संबंधित 3 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून 17,700 रुपये वसूल करण्यात आले.

यावेळी पॅनल मेंबर अॅड. पी. बी. रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव, कोर्ट मोहरर विष्णू कुमरे व न्यायालयीन कर्मचा-यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post