सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा, मार्डी येथे पार पडणार आहे. या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. संजयभाऊ देरकर, आमदार वणी विधानसभा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास जिल्हा प्रमुख मा. संजय निखाडे, विधानसभा प्रमुख मा. सुनील कातकडे, उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जेष्ठ शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या महाआरोग्य शिबिरामध्ये नेत्ररोग, मेडिसिन, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा तसेच अस्थिरोग या विभागातील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मोतीबिंदू, हर्निया, हायड्रोसील, हृदयविकार, मधुमेह, थायरॉईड, सांधेदुखी, महिलांचे आजार, लहान मुलांचे आजार, त्वचेचे विकार आदी आजारांवर तज्ञ वैद्यकीय सल्ला देण्यात येईल.
शिबिराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, नोंदणी पूर्णपणे मोफत, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी मोफत, भरती रुग्णांसाठी एक्स-रे, रक्त, लघवी तपासणी, सोनोग्राफी मोफत, खाट शुल्क व जेवण विनामूल्य तसेच आवश्यकतेनुसार सिटी स्कॅन, एमआरआय तपासणी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारे उपचार पूर्णतः मोफत असणार आहेत. महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी विनामूल्य करण्यात येणार असून शिबीरात ईसीजी सुविधाही उपलब्ध असेल.
या शिबिरात सावंगी (मेघे) रुग्णालयाची विविध आजारांची कार्डे केवळ १०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भव्य उपक्रमाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मारेगाव तालुका व समस्त पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने करण्यात आले असून समस्त ग्रामवासी मार्डी सर्कल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :पुरुषोत्तम बुटे – ९८२२१५१५६३मुलीधर उमाटे – ९९२१११२९०३दिवाकर सातपुते – १८३४७७७४५१सचिन पचारे – ९८२३२२१९३५करण किंगरे – ९७६३०९४३०७(इतर संपर्क क्रमांक प्रसिद्धीनुसार)