सह्याद्री चौफेर | लखन लोंढे
महागांव : निराधारांना आधार देण्यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजना अमलात आणली परंतू पात्रताधारक निराधार लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्याचे महापाप महागांव साजातील तलाठी दिपक दिवेकर करत आहे.
सविस्तर वृत्त असे की,मौजे महागांव येथील पंचफुला रामराव लोंढे यांचे पतीचे सन २०२१ मध्ये निधन झाले. मयत रामराव लोंढे यांना दोन पत्नी असून उपरोक्त लाभार्थी पंचफुला रामराव लोंढे ह्या दूसर्या पत्नी असतांना देखील त्यांच्या पतीने पेन्शनचा तिळमात्र दावेदार त्यांना ठेवले नाही.मोठ्या सवतीच्या खात्यावर पुर्ण पेन्शन जमा होत असुन पंचफुलाबाईंना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्या आर्थीकदृष्टया निराधार झाल्या. याशिवाय त्यांचे सावत्र मुलेही पालन पोषण करत नसून त्यांची एकटीची शिधापत्रिका आहे.
मात्र, विधवा पंचफुलाबाई ह्या संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असतांना सुद्धा येथील तलाठी दीपक दिवेकर यांनी सदर लाभार्थीला तलाठी अहवाल देण्यास नकार दिला. तलाठी दिपक दिवेकर हे कामासाठी आलेल्या लोकांना उद्धटपणाने बोलतात असे जनतेमधून एकावयास मिळत असुन यांचा कार्यालयीन कामाचा लोकांना प्रचंड त्रास होत आहे. कोतवाल उपलब्ध असतांना सुद्धा त्यांनी आपल्या शासकीय कार्यालयात खाजगी सहायक ठेवला आहे. यावरुन दिवेकर यांच्या वरकमाईचा वास सर्वत्र दरवळत आहेत.
पंचफुलाबाई ह्यांनी तहसीलदार यांना आपली परिस्थिती निवेदनातून मांडली असून आता ते काय उचित कार्यवाही करतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.
विधवेला सं.गां.यो.चा अहवाल देण्यास तलाठ्याचा नकार!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 14, 2023
Rating: