सराटी येथे अवैध दारु साठ्यावर छापा, एका संशयीत आरोपीसह मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
 
मारेगाव : तालुक्यातील सराटी येथे विभागीय स्थानिक गुन्हे शाखा व मारेगाव पोलिसांनी संयुक्त छापा मारून 46,704 हजाराच्या देशी दारू साठा जप्त करीत संशयित आरोपीस ताब्यात घेतले. ही धडक कारवाई आज गुरुवारला सकाळी सात वाजता करण्यात आली.

मारेगाव तालुक्यातील सराटी येथे अवैध देशी दारूचा साठा साठवून असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना पहाटेच्या सुमारास मिळताच पोलीस पथक सराटी येथील संशयित विवेक नरहरी नरांजे यांचे निवासस्थानी दाखल होत घर झडती घेतली असता किचन रूमलगत असलेल्या खोलीत अवैधरित्या 672 बॉटल्स भरलेले देशी दारूचे 14 बॉक्स मिळून आले. दरम्यान या साठ्याची विचारपूस केली असता कुठलाही परवाना नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर जप्त पंचनामा तयार करून एकूण 46,704 रुपयाची देशी दारू असा मुद्देमाल जप्त करीत संशयित आरोपी विवेक नरांजे (39) यास अटक करण्यात आली. 

सदर कारवाई विभागीय स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरिक्षक अतुल मोहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुनिल पिदूरकर, रजनीकांत मडावी, सतिश फुके, जमादार रजनीकांत पाटील, राजू टेकाम यांनी केली.


   

सराटी येथे अवैध दारु साठ्यावर छापा, एका संशयीत आरोपीसह मुद्देमाल जप्त सराटी येथे अवैध दारु साठ्यावर छापा, एका संशयीत आरोपीसह मुद्देमाल जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on December 14, 2023 Rating: 5
Powered by Blogger.