आरोग्य सेविकांचा तीन दिवशीय अभ्यास दौरा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : ग्रामिण भागातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेता त्याचे निराकरण करण्याकरिता आरोग्य सेविकांना योग्य उपचार पद्धतीची माहिती मिळावी, या उद्देशाने आर सि सि पि एल (RCCPL) कंपनी सिमेंट कडून अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आर.सी.सी.पी.एल. कंपनीच्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत कंपनीचे युनिट हेड जयंत कंडपाल यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील आरोग्य सेविकांसाठी कुरखेडा जि. गडचिरोली येथे तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यातून ग्रामवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्वकांक्षी उपक्रम कंपनीकडून राबविण्यात आले आहे.

या अभ्यास दौऱ्यातून त्यांना कुठल्या आजाराचा रुग्ण कसा हाताळायचा व त्या रुग्णावर कशा पद्धतीने उपचार करायचे याचे प्रशिक्षण यावेळी आरोग्य सेविकांना देण्यात आले. त्याचबरोबर त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा आरोग्य सेविकांना करून दाखविण्यात आले. ग्रामिण भागात भेडसावणाऱ्या विविध आरोग्य विषयक समस्या तसेच स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली, कुपोषित बालके यांच्या आरोग्याच्य समस्या समजून घेत त्यावर आपल्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या उपयोजना करता येईल, याचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यास दौऱ्यातून आरोग्य सेविकांना घेता आला.

या अभ्यास दौऱ्यात कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडेगाव, मुकुटबन, पिप्रट, पिप्रडवाडी, येळशी, हिरापूर, बैलंपूर, रुईकोट, परसोडा येथील आरोग्य सेविकांनी सहभाग घेतला होता. त्यांना आमच्या आरोग्यासाठी या संस्थेद्वारे भारती सोनार्गे, रजनी डोंगरवार, गणेश, अमीर तुरले, गणेश हुलके यांनी ग्रामीण भागातील आजारांवरील उपचार पद्धती या विषयी सखोल ज्ञान दिले.

या दौऱ्या दरम्यान आर.सी.सी.पी.एल.(RCCPL) कंपनीचे विभाग प्रमुख जयंत कंडपाल, तेजप्रताप त्रिपाठी, विजय कांबळे, यांनी उपस्थिती दर्शविली होती. दौऱ्यामुळे आरोग्य सेविकांना आरोग्य विषयक कार्य करण्यास नियोजन बद्ध आराखडा मिळेल, असे मत यावेळी जयंत कंडपाल यांनी व्यक्त केले.

विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करणारे ‘मिशन ई सुरक्षा’; राज्य महिला आयोग आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून नागपुरातील वनामती सभागृहात गुरुवार (दि.14) रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी सहभागी होणार असून मेटाचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

सध्या इंटरनेट हे दुधारी अस्त्र झाले आहे. त्याचे अनेक फायदे असताना, काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर मुली, महिलांना सायबर माध्यमातून आर्थिक फसवणूक, छळ, ट्रोलिंग, सेक्सटॉर्शन याला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्याकरिता तसेच भविष्यात सायबर सुरक्षित होण्याकरिता याचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींनी सायबर सुरक्षित होण्याकरिता घ्यावयाची काळजी, कायद्यातील तरतूदी, यंत्रणांची मदत याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महाविद्यालयीन मुली सायबर फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी माझ्यासमोर राज्यभरातून येत असतात. अशावेळी काय करावे हे मुलींना कळत नाही, कुठे दाद मागावी हे न कळल्याने मुली सहन करत राहतात. अनेकदा आपल्याकडूनच अधिकची माहिती सोशल मीडियात गेल्याने ही फसवणूक होण्याचे प्रकार होत असतात. अशावेळी घ्यावयाची काळजी, चुकीची घटना घडल्यास मदत मिळण्यासाठी असलेल्या यंत्रणा यांची माहिती राज्यातल्या प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी आयोगाने मेटाच्या सहकार्याने मिशन ई सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे.

हिवाळी अधिवेशनात कापसाच्या दरावर कधी आवाज उठवणार?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. विम्याचा लाभ नाममात्र असेल तर शेतकऱ्यांना सरकारी नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे कापूस आणि सोयाबीन उत्पादनाचे भाव बाजारात कमालीचे घसरले आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज कोण उठवणार? हा मोठा प्रश्न आहे.

येथे हिवाळी अधिवेशनात नागपूर विधानभवनावर विविध मागण्या घेऊन विविध संघटना मोर्चा काढत आहेत, मात्र अद्यापपर्यंत कापसाचे घसरलेले भाव आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही संघटना पुढे आली नाही. अशा स्थितीत हिवाळी अधिवेशनात कापसाच्या दराबाबत आवाज कधी उठणार? असा सवाल शेतकरी विरोधक पासून करत आहेत.

पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि पूर आणि नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. उरलेल्या कापसाला कसा तरी रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे तूर व इतर उत्पादनांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आल्याची चर्चा आहे.

पीक विम्याचा लाभ देण्याची मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात अशा प्रकारे शेतकऱ्यांना 500 ते 1000 रुपयांचा लाभ देण्यात आला. तर शेतकऱ्यांचे नुकसान यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. येथे, किसान सन्मान योजनेंतर्गत, सर्व शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपयांचा लाभ मिळत नाही. योजनेच्या नावाखाली केवळ उखळ पांढरे करणे सुरू आहे.


वणीत येणार गौतमी पाटील; जाणून घ्या कधी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : महाराष्ट्राची प्रसिद्ध मराठमोळी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील येत्या 29 डिसेंबर 2023 रोजी प्रथमच वणी शहरात येणार आहे. पारसमल प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तुत टी -10 चॅम्पियन क्रिकेट लीग उदघाटन कार्यक्रमासाठी ती वणीत येत आहे. 
याबाबतची माहिती स्वत: गौतमी पाटील हिने व्हिडिओ काढून सोशल मिडियावर शेअर केला आहे. आपल्या लावणीने तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी 'सबसे कातील गौतमी पाटील'च्या लावणीचा जलवा आता वणीत दिसणार आहे. या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त असणार असून तीच्या दिलखेचक अदाकाराचा ठेका स्थानिक शासकीय मैदान (पाण्याची टाकी) येथे थिरकणार आहे.
गौतमी पाटील सध्या आपल्या लावणीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. तिच्या अदाकारीची तरुणाई मध्ये तुफान क्रेज देखील आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तरुणाईची अफाट तोबा गर्दी असते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या लावणीच्या कार्यक्रमात तरुणाईने धांगडधिंगा घातल्याने अनेक वेळा गौतमी यांचा कार्यक्रम चर्चेत राहिला आहेत.आता ती वणी येथील उदघाटन कार्यक्रमाकरिता व्हिडिओच्या माध्यमातून मी येतेय, तुम्ही पण या असं तिनं आवाहन केलेले आहे. त्यामुळे विदर्भासह वणीतील तीच्या चाहत्यांची उसत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पदमाकर नक्षणेजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली


"१२ वा पुण्यस्मरण
    बाबा... पदमाकर नक्षणे!
              आज आपणास देवाज्ञा होत तपाचा काळ लोटला असला तरी तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं. तुमच्या हयातीतील स्थितीचे आमच्या आयुष्यातील धवल अन सुंदर पर्व होते.
         वर्तमान स्थितीत सर्वकाही असण्याची जाणीव जरी असली तरी तुम्ही नसणे ही पितृतुल्य नसण्याची पोकळी न भरून निघण्याची मोठी उणीव आहे.
        तुमच्या आठवणीचे लय आमच्या जगण्याला दिशादर्शकाचे बळ देत राहील.. बाबा आपणास बाराव्या स्मृतिदिनी हीच श्रद्धांजली ...!
             शोकाकुल:- 
 श्रीमती मंगला पदमाकर नक्षणे
 सौ. शुभांगी अरविंद शेंडे
 सौ. सुजाता ऋतूपर्ण कीर्तीवार
 श्री.आनंद पदमाकर नक्षणे
 सौ. प्रिया आनंद नक्षणे