सह्याद्री चौफेर | राजू डावे
आर.सी.सी.पी.एल. कंपनीच्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत कंपनीचे युनिट हेड जयंत कंडपाल यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांतील आरोग्य सेविकांसाठी कुरखेडा जि. गडचिरोली येथे तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यातून ग्रामवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक महत्वकांक्षी उपक्रम कंपनीकडून राबविण्यात आले आहे.
या अभ्यास दौऱ्यातून त्यांना कुठल्या आजाराचा रुग्ण कसा हाताळायचा व त्या रुग्णावर कशा पद्धतीने उपचार करायचे याचे प्रशिक्षण यावेळी आरोग्य सेविकांना देण्यात आले. त्याचबरोबर त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा आरोग्य सेविकांना करून दाखविण्यात आले. ग्रामिण भागात भेडसावणाऱ्या विविध आरोग्य विषयक समस्या तसेच स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली, कुपोषित बालके यांच्या आरोग्याच्य समस्या समजून घेत त्यावर आपल्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या उपयोजना करता येईल, याचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यास दौऱ्यातून आरोग्य सेविकांना घेता आला.
या अभ्यास दौऱ्यात कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडेगाव, मुकुटबन, पिप्रट, पिप्रडवाडी, येळशी, हिरापूर, बैलंपूर, रुईकोट, परसोडा येथील आरोग्य सेविकांनी सहभाग घेतला होता. त्यांना आमच्या आरोग्यासाठी या संस्थेद्वारे भारती सोनार्गे, रजनी डोंगरवार, गणेश, अमीर तुरले, गणेश हुलके यांनी ग्रामीण भागातील आजारांवरील उपचार पद्धती या विषयी सखोल ज्ञान दिले.
या दौऱ्या दरम्यान आर.सी.सी.पी.एल.(RCCPL) कंपनीचे विभाग प्रमुख जयंत कंडपाल, तेजप्रताप त्रिपाठी, विजय कांबळे, यांनी उपस्थिती दर्शविली होती. दौऱ्यामुळे आरोग्य सेविकांना आरोग्य विषयक कार्य करण्यास नियोजन बद्ध आराखडा मिळेल, असे मत यावेळी जयंत कंडपाल यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेविकांचा तीन दिवशीय अभ्यास दौरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 12, 2023
Rating: