हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : उपराजधानी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केले.

नागपूर येथे दि. आज 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, कामगार मंत्री सुरेश खाडे, कौशल्य विकास, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, ॲड. आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विदर्भामध्ये हे हिवाळी अधिवेशन होत आहे. विदर्भाशी आमचे जिव्हाळ्याचे नातं आहे. विदर्भातील जनतेलाही अधिवेशनामधून न्याय देताना एक विशेष आनंद होत आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि कालबद्ध रितीने जे प्रकल्प, योजनांचे निर्णय घेतले आहेत, ते पूर्ण केले जातील. गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास कामे पोहोचवण्याचे काम हे सरकार करत आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण विषयावर सरकारची भूमिका ही सुरुवातीपासून अतिशय प्रामाणिक आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी व इतर समाजावर अन्याय होणार नाही. तसेच कोणाचेही आरक्षण कमी केले जाणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका असून त्यावर मंत्रिमंडळ ठाम आहे. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने संयम ठेवावा.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन – 2023 नागपूर

प्रस्तावित विधेयकांची व अध्यादेशांची यादी

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश - 03

संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयक - 07

विधान परिषदेत प्रलंबित - 01

विधानसभेत प्रलंबित - 02

पूर्वीची प्रलंबित विधेयके (एकूण) - 10

प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) - 09

प्रस्तावित विधेयके एकूण - 09

संयुक्त समितीकडे प्रलंबित

(1) सन 2022 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)

(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नौकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा ) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(3) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणीत किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा किटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, 2023.

(4) सन 2023 चे विधान सभा विधेयक- किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5) सन 2023 चे विधान सभा विधेयक- बी-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(6) सन 2023 चे विधान सभा विधेयक - अत्यावश्यक वस्तु (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(7) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

विधान परिषदेत प्रलंबित

(1)   सन 2022 चे विधान सभा विधेयक - स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

विधानसभेत प्रलंबित विधेयके

(1) सन 2023 चे विधान सभा विधेयक -महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

(2)  सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

प्रस्तावित विधेयके

(1) सन 2023 चे विधानसभा विधेयक - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (कॅसिनो, घोड्यांची शर्यत व ऑनलाईन खेळ यांच्या करपात्रतेच्या संबंधात स्पष्टता आणण्याकरीता.)

(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे इ. साठीचे वेळापत्रक वाढवण्याकरीता व औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नाव बदलाने  त्यास अनुसरुन सुधारणा करण्याकरीता)


(1) सन 2022 चे विधान सभा विधेयक - स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

विधानसभेत प्रलंबित विधेयके

(1) सन 2023 चे विधान सभा विधेयक -महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)

(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

प्रस्तावित विधेयके

(1) सन 2023 चे विधानसभा विधेयक - महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (कॅसिनो, घोड्यांची शर्यत व ऑनलाईन खेळ यांच्या करपात्रतेच्या संबंधात स्पष्टता आणण्याकरीता.)

(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे इ. साठीचे वेळापत्रक वाढवण्याकरीता व औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नाव बदलाने त्यास अनुसरुन सुधारणा करण्याकरीता)

(3) सन 2023 विधान सभा विधेयक - महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2023. (गृहनिर्माण विभाग) ( नियोजन प्राधिकरणाने पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, वेश्म मालकांच्या संघटनेने किंवा पुनर्विकासाकरिता जबाबदार असलेल्या विकासकाने, अशा निवासव्यवस्थेऐवजी पर्यायी तात्पुरती निवास व्यवस्था पुरविण्यास किंवा भाडे देण्यास अधीन राहून, वेश्म रिकामा करण्यास वेश्म मालकांना बंधनकारक करण्यासाठी व अशा पुनर्विकासाच्या प्रस्तावाला नियोजन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर जे वेश्म मालक वेश्म रिकामे करण्यास नकार देतील अशा वेश्म मालकांना त्वरित निष्कासित करण्यासाठी नवीन कलम 6ब समाविष्ट करुन त्यात सुयोग्य सुधारणा करण्यासाठी)

(4) सन 2023 चे विधान परिषद विधेयक - आलार्ड विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

(5) सन 2023 चे विधानसभा विधेयक - महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर), (निरसन) विधेयक, 2023. (गृह विभाग) (महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 याचे निरसन करण्यासाठी) (गृह विभाग).

(6) सन 2023 चे विधानसभा विधेयक - चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (अधिनियमाच्या कलम 70 खालील अपिलांची सुनावणी करण्यासाठी राज्य शासनाद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला अधिकार प्रदान करण्याकरीता).

(7) सन 2023 चे विधान सभा विधेयक - महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) विधेयक, 2023 (कृषी व प.दु.म विभाग)

(8) सन 2023 चे विधान सभा विधेयक- महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2023 (महसूल विभाग)

(9) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र (तृतीय पूरवणी), विनियोजन विधेयक, 2023.

राष्ट्रवादी वणी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी संघर्ष यात्रेत सामील

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेत वणी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रवाना झाले आहेत.
राज्यातील युवकांच्या बेरोजगारीवर, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याकरिता व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा व आर्थिक मदत मिळण्याकरिता तसेच सरकारी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात युवकांचे प्रश्न घेऊन पद यात्रा काढण्यात आली.

"हा राजकीय प्रवास नाही. तरुणांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. जे संबंधित आहेत ते यात्रेत सामील होऊ शकतात,” रोहित पवार म्हणाले."
या संघर्ष यात्रेमध्ये वणी विधानसभा क्षेत्रामधून राष्ट्रवादी चे विजय नगराळे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष यवतमाळ, खुशाल बासमवार कार्यकारी तालुका अध्यक्ष वणी, गुणवंत टोंगे ओबीसी सेल अध्यक्ष वणी, तालुका रामकृष्ण वैद्य जिल्हा सरचिटणीस यवतमाळ व इतर कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये देवगाव जिल्हा अमरावती येथून पुलगाव पर्यंत पदयात्रेत सामील झाले आहे. या पदयात्रेचा समारोप नागपूर येथे होणार आहे असे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले. 

सह्याद्री चौफेर च्या वृत्ताची दखल : लाखापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : लाखापूर ते वनोजा देवी रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. येथील ग्रामस्थांच्या मागणीला प्रशासन दरबारी मांडण्यासाठी सातत्याने सह्याद्री चौफेरने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर सह्याद्री चौफेरच्या वृत्तची दखल घेत लाखापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अशी येथील ग्रामस्थांनी माहिती दिली.
तालुक्यातील भांदेवाडा,लाखापूर ते वनोजा देवी या दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याचे काम व्हावे या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी 'सह्याद्री चौफेर'च्या माध्यमातून शासन प्रशासनाकडे गेल्या अनेक महिन्यापुर्वी मागणी होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाबाबत दुर्लक्ष करित असल्याचे गावाकऱ्यातून सांगितलं जात होत. येथील सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसेना तालुका संघटक प्रवीण भाऊ बलकी, यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी संबंधित विभागाच्या उदासीन धोरणाविरोधात उपोषणाचे हत्यार उपासणार, असे वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाने या भागाची पहाणी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
त्यामुळे उशीर का होईना! कामाला सुरुवात झाली. याबाबत सह्याद्री चौफेर चे आभार प्रवीणभाऊ बलकी, संजय देवतळे, योगीराज बलकी, राजू डावे, हेमंत दानव, अमोल डावे, विनोद मेश्राम, गणेश धोबे, माजी सरपंच आकाश भोसले (डोल डोंगरगाव) यांच्या सह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. या पुढेही असेच सहकार्य असावे, असे मत श्री प्रवीण बलकी यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना व्यक्त केले. 

मारेगाव शहरात दोन ठिकाणी बस थांबा द्या - भाजप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरातील मुख्य मार्गावरील विविध ठिकाणी बसचा थांबा देण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन तालुका भाजप मारेगावच्या वतीने काल मंगळवार ला वणी आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.
मारेगाव शहरातील कला वाणिज्य महाविद्यालय जवळ वणी वरून यवतमाळ कडे जाताना, मार्डी रोड तसेच नियमित ठिकाणी व यवतमाळ वरून वणीकडे येत असताना मार्डी रोड, नियमित ठिकाण व शहरातील राष्ट्रीय विद्यालय येथे बस थांबा द्यावा अशी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांच्या नेतृत्वात आगार प्रमुख, आमदार व यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक यांना मागणी करण्यात आली. शहरातील मार्डी चौक, विद्यालय ते महाविद्यालय या मार्गावर बस थांब्याची आवश्यकता आहे. सर्वसाधारण लोकांना येजा करण्याकरिता वाढत असलेली वस्ती बघता मारेगावातील लोकांना वणी वरून जाताना बस थांबा दोन ठिकाणी देण्यात यावा तसेच यवतमाळ वरून येताना दोन ठिकाणी बस थांबा द्यावा अशी मागणी आहे.
शहरातील प्रवाशांना बस पकडण्याकरिता रोजच दोन किलोमीटर पायी अंतर कापत धावपळ करावी लागते. मात्र, शहरात येथे बस थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथून बसणाऱ्यांची प्रवासी संख्या पाहता नमूद ठिकाणी बस थांबा देण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, रविंद्र टोंगे, सुमित जुनगरी व परिसरातील नागरिकांनी यांनी केली आहे.

"त्या" घटनेची चौकशी करून दोंषीवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा..अजिंक्य शेंडे यांचा गर्भीत ईशारा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : विद्युत तारा व लोखंडी खांब चोरी प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या शंकर सुपारी कुमरे, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावे, तक्रारीची वेळीच दखल न घेतल्यास संबंधितांना दोषी ठरवत कठोर कारवाई करावी, अशी उप जिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्फत डॉ.पवन बनसोड जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदनातून करण्यात आली.

गेल्या एक वर्षापासून वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरू असून यात लाखों रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला जात आहे. याबाबत विद्युत विभाग मार्फत वणी, शिरपूर आणि मुकुटबन पोलिसात तक्रार दाखल असुन अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने चोरटे मोकाट फिरत आहे. असा आरोप अजिंक्य शेंडे यांनी केला आहे. गंभीर बाब म्हणजे याप्रकरणात आतापर्यंत तिन युवकांचा विद्युत करंट लागुन मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. 

दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परसोडा परिसरात विद्युत तारा कापण्याचा प्रयत्न करत असताना एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अश्याच प्रकारच्या घटनेत काही महिन्यांपूर्वी दोन युवकांचा बळी गेला आहे. तरीसुद्धा विद्युत तारा व लोखंडी खांब कापण्याचा सपाटा सुरूच आहे. मात्र, चोरीतील मुद्देमाल हा भंगार व्यावसायिकांच्या घशात घातला जात आहे. यामध्ये भंगार व्यावसायिक मालामाल होत असून चोरटे दारुच्या नशेत आपला जीव गमावत आहे. ही चिंतेची बाब असून विद्युत तारा कापल्यावर वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे १८ नोव्हेंबर २०२३ ला विद्युत तारा कापण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाल्याने या चोरीच्या प्रकरणातील चोरटे निष्पन्न झाले असूनही ते आरोपी मोकाट फिरत असल्याचा,त्यांनी थेट सवाल शेंडे यांनी उपस्थित केला आहे.

ऐवढी मोठी गंभीर घटना घडत असताना मात्र वणी, शिरपूर व मुकुटबन पोलिस कारवाई न करता हातावर हात ठेवून निवांत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण या चोरीच्या घटनेचा तपास करावा व गुन्हेगारांवर आठ दिवसांच्या आत कारवाई करावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा गर्भीत ईशाराही अजिंक्य शेंडे यांनी दिला आहे. 

वणी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील साहित्य, स्पींकलर, झटका मशीन असे साहित्य चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, याबाबतची तक्रार देण्यासाठी शेतकरी वणी पोलीस ठाण्यात गेले असता तक्रारींची रिपोर्ट  (FIR) घेण्यात येत नाही. त्यांना लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला देतात मात्र, तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. असा आरोप त्यांनी लगावला आहे.